Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

NGMA मुंबईत ‘नभ: स्पर्श’चे उद्घाटन: १५० भारतीय महिला प्रिंटमेकर्सच्या कलाकृतींचा उत्सव

 NGMA मुंबईत ‘नभ: स्पर्श’चे उद्घाटन: १५० भारतीय महिला प्रिंटमेकर्सच्या कलाकृतींचा उत्सव



नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (NGMA), मिनिस्ट्री ऑफ कल्चर, भारत सरकार, यांच्या सहयोगाने 'नभ: स्पर्श – इंडियन वुमन प्रिंटमेकर्स' या प्रदर्शनाचा मुंबईतील आवृत्तीचा उद्घाटन सोहळा २५ एप्रिल २०२५ रोजी पार पडला. या प्रदर्शनात देशभरातून आणि विविध पिढ्यांमधील १५० महिला कलाकारांच्या प्रिंटमेकिंग कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. लिथोग्राफ, एचिंग, अ‍ॅक्वाटिंट, एन्ग्रेव्हिंग, स्क्रीन प्रिंट्स आदी तंत्रांचा समावेश असलेले हे प्रदर्शन, महिलांच्या प्रतिभेची विविधता आणि प्रिंटमेकिंगमधील त्यांच्या योगदानाचे व्यापक दर्शन घडवते. प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योजिका आणि जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता जिंदाल यांच्या हस्ते झाले. 



यावेळी (NGMA) एनजीएमएचे महासंचालक (Director General) डॉ. संजीव किशोर गौतम आणि एनजीएमएच्या संचालिका (Director) निधी चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या इतर मान्यवरांमध्ये लॉरेंट वेरगैन, फेरोझा गोदरेज, डॉ. सरयू दोषी, ब्रिंदा मिलर, श्रुती दास, असद लालजी, नैना कनोडिया, संजुक्ता अरुण, रुक्मिणी दहानुकर यांचा समावेश होता.




हे प्रदर्शन एनजीएमएच्या वतीने श्रुती दास – उपक्युरेटर (Deputy Curator) यांच्या सहकार्याने सादर करण्यात आले आहे. ‘नभ: स्पर्श’ भारतीय प्रिंटमेकिंगच्या प्रवासाची कथा महिला कलाकारांच्या दृष्टिकोनातून मांडते. कलात्मक दर्जा, नवकल्पना आणि व्यक्तिशक्ती यांची झलक देणारे हे प्रदर्शन प्रेक्षकांना या कलाकारांच्या वैयक्तिक अनुभवांच्या आणि सर्जनशील वाटचालीच्या जवळ घेऊन जाते.



एनजीएमएच्या संग्रहातून निवडलेल्या काही वरिष्ठ आणि प्रथितयश कलाकारांच्या कलाकृती या प्रदर्शनात समाविष्ट आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.