Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*शिवाच्या सासरी दिव्याने घातला धुमाकूळ*

*शिवाच्या सासरी दिव्याने घातला धुमाकूळ*

*आशु- शिवा मध्ये जवळकी वाढणार !*



*'शिवा'* मालिकेत जगदीशमुळे शिवाच्या वस्तीत टेंशनच वातावरण आहे. शिवाला गोष्टी कळतात आणि ती  घरी धावत येते तिकडे जगदीशसोबत जोरदार फाईट होते. बाई आजीही त्यात सहभागी होते, पण जगदीश कागदपत्रं दाखवून कायदेशीर मालकी आपल्याकडे असल्याचं सिद्ध करतो. पोलिस येतात आणि आजीला अटक करतात. पण तितक्यात शिवा आणि आशु मध्यस्ती करतात. आता दिव्याला समजतं की कीर्तीने तिची फसवणूक केलेय.  दिव्याने खोटी प्रेग्नन्सी दाखवल्यामुळे बाईआजीला नाईलाजास्तव देसाई कुटुंबात रहावं लागतं. आता दिव्या कीर्तीच्या खोलीत राहायला जाते, आणि यामुळे दोघींमध्ये वाद होतो. या सगळ्यात आशूने शिवा ला दिलेल्या पाठिंब्यामुळे तो शिवाच्या आणखी जवळ येतो आणि हे पाहून दिव्या अस्वस्थ आहे. 

 

*आजी आणि दिव्या, शिवाच्या सासरी आल्यावर काय धुमाकूळ घालणार यासाठी बघायला विसरू नका दररोज रात्री ९:०० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.