* रमाकांत मुंडे यांना या वर्षी चा सांस्कृतिक कलादर्पण पत्रकारिता पुरस्कार संतोष जुवेकर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.*
२७ वा चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत सांस्कृतिक कलादर्पण गौरव पुरस्कार २०२५ भव्य चित्रपट महोत्सवाची सुरवात काल प्रसिद्धअभिनेते संतोष जुवेकर, निर्भिड लेखचे संपादक, नाट्य निर्माते कांतिलाल कडू आणि निर्माते दत्ताजी जवळगे यांच्या शुभ हस्ते महोत्सवाचे उदघाटन झाले. तदसमयी नॅशनल अवॉर्ड विजेते चित्रपट दिग्दर्शक रमेश मोरे, शॉर्ट फिल्म चे परिक्षक पद्माकर गांधी, लेखक महेंद्र पाटील उपस्थित होते. यावेळी शॉर्ट फिल्मचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. खजिनदार सर्वेश सांडवे, स्पर्धा प्रमुख सुधीर सोमवंशी, व्यवस्थापक विकास मोजर, कार्यकर्ते गणेश तळेकर, लव क्षीरसागर, पराग सारंग, प्रतीक बोले, आदर्श सातपुते सागर पतंगे यांनी विशेष आयोजन करून महोत्सव पार पाडला महोत्सवाचे सूत्रसंचालन तेजस्विनी मुंडये यांनी केले. विविध चित्रपटांच्या स्क्रीनिंगला अभिनेते गौरव मोरे, दिग्दर्शक समित कक्कड़, दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर, लेखक संजय नवघिरे, दिग्दर्शक निर्माते अजय भालेराव, तिरूपति बालाजी देवस्थानचे पुजारी उपस्तिथ होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष-संस्थापक चंद्रशेखर सांडवे यांनी सर्वांचे आभार मानले.