Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*मंजिरीच्या हाती लागणार मीरा जवळची सुरक्षा कवडी ?*

*मंजिरीच्या हाती लागणार मीरा जवळची सुरक्षा कवडी ?*



*'तुला जपणार आहे'* मालिका मनोरंजक वळण घेत आहे. शिवनाथला रामपुरे कुटुंबाबद्दल काहीही माहिती नसतानाही, दादासाहेबांना इशारा देतो की  तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलासाठी "दुसरी पत्नी विनाश घेऊन येईल. ही लग्नगाठ लागू देऊ नकोस." दादासाहेब त्याला एक योगी मानतात. शिवनाथ त्याला सल्ला देतात की साखरपुड्याच्या आधी दोघांचाही पत्रिका तपासून घ्या. दादासाहेब घरी कुंडलीबद्दलचा विषय काढतात. माया अनाथालयात वाढलेली असल्यामुळे तिच्याकडे कुंडली नाही. मात्र मंजिरीला आठवतं की माया नवजात असताना तिला टाकून देण्यात आलं होती, आणि तिची जन्मतारीख लक्षात घेऊन मायासाठी कुंडली बनवते. दरम्यान, मीराला अंबिकाचे वागणं संशयास्पद वाटू लागलंय. अंबिका साखरपुड्याच्या दिवशी अतिशय आर्जवाने अथर्वकडे पाहते. हे मीराच्या लक्षात आलंय. या गोंधळात, मंजिरी सातत्याने मीराकडून पवित्र कवडी मिळवण्याचा प्रयत्न करतेय. ती मीराला वेदाची जबाबदारी देऊन तिचं लक्ष विचलित ठेवते, जेणेकरून ती सावध राहणार नाही. शेवटी, एक क्षण असा येतो की मीराच कवडीकडे दुर्लक्ष होत आणि मंजिरीला एक संधी मिळते.



*आता मंजिरीला मीराजवळची कवडी मिळेल का? शिवनाथचा इशारा दादासाहेब समजू शकतील ?  यासाठी बघायला विसरू नका 'तुला जपणार आहे' सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.