*"मी हलकं -फुलकं आणि सहजपणे पचेल असाच आहार घेते" - शरयू सोनवणे*
फास्ट फूड आणि जंक फूडच्या या जगात निरोगी आणि सकस आहार आव्हानात्मक वाटू शकत. परंतु खऱ्या, नैसर्गिक घटकांनी शरीराचे पोषण करणे वाढत्या वयासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. फास्ट फूड पेक्षाही, सकस आहार ही एक जीवनशैली आहे जी काम करायला अधिक ऊर्जा देते. कलाकार कसे आपल्या आहाराची काळजी घेतात याची उत्सुकता तुम्हालाही असेल. आज तुमची लाडकी पारू म्हणजेच *शरयू सोनावणे* हिने शेयर केलाय आपला दिवसाचा आहार. " मी जास्तकरून हलकं -फुलकं आणि सहजपणे पचेल असाच आहार घेते. मी सकाळी उठल्यावर भिजवलेले ड्रायफ्रुट्स खाते. त्यानंतर जिरापाणी किंवा नारळपाणी पिते. मग सेटवर येऊन पोहे, उपीट, इडली किंवा ऑम्लेट ब्रेड असा काहीतरी ब्रेकफास्ट करते. त्यानंतर एखादं फळ जस संत्र, सफरचंद, मस्कमेलन, कलिंगड किंवा किवी. सकाळचा नाष्टा झाल्यानंतर मधल्या वेळेत म्हणजे सकाळी ११ ते १२:३० मध्ये सलाड खाते आणि त्यानंतर मी सरळ दुपारी जेवते. दुपारच्या जेवणात एक भाकरी आणि कुठलीही भाजी त्याच्याजोडीला दही.
कधी फारच मन केल तर डाळ खिचडी मध्ये इंद्रायणी भात खाते. लंचनंतर सूर्यास्ता पर्यंत मखाना, चणे - शेंगदाणे किंवा ड्रायफ्रुट्सचे लाडू खाते आणि यासोबत माझं दिवसभराचं खाणं संपत. आधी मी संध्याकाळी ७ वाजता लास्ट मिल करायचे आता दुपारी जेवण झालं त्यानंतर पौष्टिक आणि हलके स्नॅक्स घेते. कारण सूर्यास्त झाला कि आपली पाचन शक्ती मंद होते. मी दिवसभरात २.५ ते ३ लिटर पाणी पिते आणि उन्हाळ्यात ताक आणि सब्जाचे पाणी घेते. शक्यतो घरचंच खाल्ल पाहिजे कधीतरी बाहेरच खाऊ शकतो जसे मी जेव्हा घरी सुट्टीसाठी जाते तेव्हा माझ्या मनाला येईल ते मी खाते. पण पुन्हा 'पारू" च्या सेटवर आले कि नेहेमीचा नित्यक्रम पाळते. जर तुम्ही निरोगी असाल तरच तुम्ही आपले काम चांगल्या प्रकारे करू शकता."
*पौष्टिक आहार खात राहा आणि बघायला विसरू नका "पारू" दररोज संध्या ७:३० वा फक्त आपल्या झी मराठीवर.*