Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*मुंबई मध्ये महासंगम शूट म्हणजे माझ्यासाठी चीट डे - मृण्मयी गोंधळेकर*

*मुंबई मध्ये महासंगम शूट म्हणजे माझ्यासाठी चीट डे - मृण्मयी गोंधळेकर*

*जगताप आणि मेहेंदळे कुटुंबाचे संबंध बिघडणार की त्यांच्या मध्ये बिझनेस डील होणार ?*


जगताप आणि मेहेंदळे कुटुंब एकत्र आले आहे आणि निमित्त आहे बिझनेसच. हल्लीच *‘लाखात एक आमचा दादा’* मालिकेत धनूच्या लग्नासाठी सूर्याने पाच लाखांची उचल घेतली होती. ते कर्ज त्याला लवकरात लवकर परत करायचे आहे, नाही तर त्याच्या घरावर जप्ती येऊ शकते. त्यामुळे सूर्याचे संपूर्ण कुटुंब तणावात आहेत आणि सर्वजण आपल्या पद्धतीने सुर्याला मदत करत आहेत. तर, दुसरीकडे *‘सावळ्याची जणू सावली’* मालिकेत सावलीच्या लहान भावाला  दवाखान्यात दाखल केले आहे. त्यासाठी सावलीला पैशांची गरज आहे. त्यासाठी ती भैरवीकडे मदत मागते, पण भैरवी तिला मदत न करता तिचा अपमान करते. पण सावलीच्या मदतीला जगन्नाथ येतो. जेव्हा हे सारंगला समजत तेव्हा सावलीने आपल्याकडे मदत न मागितल्याने त्याला वाईट वाटत. 



दरम्यान तिलोत्तमा आणि कुटुंबातील इतरांना सारंग सांगतो की राजश्री प्रॉडक्टकडून काही माणसं भेटायला येणार आहेत. तिलोत्तमा म्हणते की, या हर्बल हळदीची जोड मिळाली तर ‘रूपम कॉस्मेटिक्स’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाईल. पण या डिलसाठी सारंगचा भाऊ खुश नाहीये. त्याला  गावातल्या  लोकांशी हे डील होऊ द्यायची नाही. राजकुमारने तिलोत्तमाला राजश्री विषयी चुकीच्या गोष्टी सांगितल्याने तिलोत्तमा संतापते आणि राजश्रीचा अपमान करते. दुखावलेली राजू तिथून परतते. इकडे सूर्या संतापलाय तो तिलोत्तमाच्या घरासमोर तंबू टाकत ठरवतो की जोपर्यंत तिलोत्तमा राजूची माफी मागत नाही, तो तिथून हलणार नाही. हा प्रकार गावभर चर्चेचा विषय बनलाय. आता सारंगची कोंडी होतेय. तो सूर्याचा मित्र असल्याने सूर्याला समजावण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. पण सूर्या हट्ट सोडायला तयार नाही. सारंग आईला म्हणजेच तिलोत्तमाला समजावण्याचा प्रयत्न करतो की तिने ऐकलेल्या गोष्टी खऱ्या नसतील आणि राजू निर्दोष असू शकते. *तुळजा म्हणजेच* *मृण्मयी गोंधळेकर* ने मुंबई मध्ये महासंगम शूटचा अनुभव व्यक्त करताना सांगितलं, उत्तम काम करायला मिळत आहे या गोष्टीचा मला आनंद आहे आणि त्यासोबत टीमची छान साथही मिळत आहे. महासंगमसाठी आम्ही साताऱ्याहून मुंबईला आलो आहोत. मी कोठारे व्हिजन सोबत पूर्व ही काम केले आहे ती टीम माझ्या ओळखीची आहे त्यांना पुन्हा भेटून खूप आनंद झाला. सातारा मध्ये शूट करण्याचा माझा पहिला अनुभव आहे या आधी मी जे ही काम केले आहे ते मुंबईलाच केल आहे. महासंगम शूटच्या निमित्ताने अस वाटल कि परत घरी आली आहे. मला फास्ट फूड आवडत, आम्ही सेटवर ते ऑर्डर केल आणि त्याचा आनंद घेतला. गर्मीला बीट करण्यासाठी मी ताक पीते मग ती सातारच्या गर्मी असो किंवा मुंबईची. माझ्यासाठी महासंगम शूट म्हणजे माझी चीट डेज होते. जेवढी मज्जा आम्हाला महासंगम शूट करताना आली आहे, तुम्हाला पाहायला ही तितकीच मज्जा येणार आहे." 


*आता जगताप आणि मेहेंदळे कुटुंबाचे संबंध बिघडणार की त्यांच्या मध्ये बिझनेस डील होणार ?* *तिलोत्तमा राजूची माफी मागेल ?  यासाठी बघायला विसरू नका 'लाखात एक आमचा दादा' आणि 'सावळ्याची जणू सावली' चा महासंगम ७ ते १३ एप्रिल दररोज* *संध्या ६:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.