ड्रामेबाज वेदांती भोसले आणि प्रांजली पवार अभिनीत ‘बार्बी डॉल’ गाणं ‘सप्तसूर म्युझिक’द्वारे प्रेक्षकांसमोर
सप्तसुर म्युझिक निर्मित प्रांजली पवार दिग्दर्शीत ड्रामेबाज वेदांती भोसले अभिनीत बार्बी डॉल गाण्याची चर्चा
यंदाही उन्हाळी सुट्टी होणार अधिक खास, चिमुकल्यांच्या भेटीसाठी आलेलं ‘बार्बी डॉल’ गाणं करणार मनावर राज्य
उन्हाळी सुट्टी सुरू होताच लहानग्यांची चांगलीच धमाल मस्ती सुरू असलेली पाहायला मिळतेय. शाळा, अभ्यासाला सुट्टी मिळाल्याने ही चिमुरडी मंडळी विशेष धमाकूळ घालताना दिसत आहेत. शिवाय घरी ही त्यांची मजा मस्ती सुरूच आहे त्यामुळे कुठे ना कुठे आईचा त्यांना सांभाळायचा त्रास हा वाढलेला दिसतोय पण यात आई मात्र कुठेही दमलेली दिसत नाहीये. ती आपल्या मुलांच्या मागे त्यांना काय हवं नको ते पाहण्यात अगदी मग्न झाली आहे. अशातच उन्हाळी सुट्टीच्या दरम्यान एका ‘बार्बी डॉल’ या गाण्याने सर्वत्र धुमाकूळ घातलाय. नुकतच हे गाणं आर्टिस्ट इन्फ्लुएन्सर साईनाथ राजाध्यक्ष यांच्या ‘सप्तसूर म्युझिक’ या युट्युबवर प्रदर्शित झालं असून या गाण्यानुसार आई आणि मुलीमधील खास बॉण्ड पाहायला मिळत आहे.
दिवसभर घर कामात दंग असणारी आई तिच्या मुलींनाही तितकच प्रेम देत त्यांचा किती सांभाळ करते याच सुंदर असं वर्णन या गाण्यातून करण्यात आले आहे. एका आईसाठी तिची लेक ही ‘बार्बी डॉलच असते, हे या गाण्यातून स्पष्ट होते. तर त्या चिमुरडीलाही आईप्रमाणे तिच्या खेळण्यातल्या बार्बी डॉलला जपायचं असतं हे सुद्धा या गाण्यातून दाखवण्यात आले आहे. या गाण्याचा ऑडिओ गेल्या वर्षीच प्रदर्शित झाला होता मात्र या गाण्याचा व्हिडीओ केव्हा येणार याकडे साऱ्यांच्याच नजरा लागून राहिल्या होत्या आणि अखेर आता हे गाणं साईनाथ राजाध्यक्ष यांच्या ‘सप्तसूर म्युझिक’ या युट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, “सप्तसूर म्युझिक नेहमीच नवनव्या आणि आशयघन गाण्यांना लॉंच करण्याची संधी देत असत. प्रेक्षकांना आशयघन विषय नेहमीच आवडतात. त्यामुळे आई-मुलीचा खास बाँड असलेलं हे गाण सप्तसूर म्युझिक तुमच्यासाठी घेऊन आल आहे”.
समोर आलेल्या या गाण्यात सुप्रसिद्ध बालकलाकार वेदांती भोसले महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतेय तर तिच्या आईच्या भूमिकेत अभिनेत्री प्रांजली पवार यांना पाहणं ही रंजक ठरतंय. तर या गाण्याच्या दिग्दर्शनाची धुराही प्रांजली पवार यांनी सांभाळली आहे. तर असिस्टंट दिग्दर्शक म्हणून प्राजक्ता हेंद्रे यांनी जबाबदारी पेलवली आहे. संपूर्ण गाणं मयूर पारणकर यांनी त्यांच्या कॅमेरात कैद केले आहे. ‘प्रांजली फिल्म प्रोडक्शन’ अंतर्गत हे गाणं चित्रीत करण्यात आलं असून साऱ्या बाल मित्रांसह हे गाणं आता त्यांच्या आईंसाठी ही असल्याचे दिसतेय आणि ते प्रत्येकाच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. तुम्ही ‘बार्बी डॉल’ हे गाणे बघितले का?? साईनाथ राजाध्यक्ष यांच्या सप्तसुर म्युझिकवर आणि नसेल बघितलं तर हे गाणं ‘सप्तसूर म्युझिक’ या युट्यूब चॅनेलवर बघायला विसरू नका.