कामगार दिनानिमित्त बांधकाम मजुरांसाठी सुगी ग्रुपचा सूरमय सलाम; विशाल ददलानी यांच्या दमदार आवाजात आलंय खास गाणं!*
मुंबई, 29 एप्रिल 2025: आपण आपलं हक्काचं घर बनवताना , कधीतरी खरंतर थोडं थांबलं पाहिजे… आणि एकदा तरी त्या बांधकाम मजुरांच्या हातांकडे पाहिलं पाहिजे , ज्या हातांनी आपल्या स्वप्नातलं घर उभं केलं. कदाचित आपल्याला त्यांचं नाव माहीत नसेल, पण त्यांच्या कष्टांमध्ये त्यांनी घडवलेली मेहनतीची आणि संघर्षाची एक अविश्वनीय कहाणी दडलेली असते. त्यामुळेच १ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने, सुगी ग्रुपने आपल्या प्रकल्पांचा आत्मा असलेल्या बांधकाम मजुरांसाठी एक हृदयस्पर्शी गाणं सादर केलं आहे. हे गीत ख्यातनाम गायक विशाल ददलानी यांच्या दमदार आवाजात साकारलेलं असून, संगीतकार चैतन्य पंडित यांनी ते संगीतबद्ध केलं आहे आणि गीतकार चैतन्य पंडित व चिराग मोदी यांनी शब्दबद्ध केलं आहे.
नितीन साळुंखे, सुगी ग्रुपचे को-फाउंडर आणि पार्टनर, म्हणाले:“सुगी ग्रुपमध्ये आम्ही वेळेवर वितरणाचं वचन फक्त देत नाही, तर ते अभिमानाने पाळतो.— हे फक्त आपल्या बांधकाम कामगारांच्या अथक परिश्रमाने शक्य झाले आहे. त्यांचे योगदान जे खूप वेळा गृहित धरले जाते, त्याला मनापासून ओळख मिळावी, म्हणून आम्हाला हे गीत तयार करायचं होतं. या गाण्याची रचना आपल्या कामगारांच्या जीवनातील रोजच्या ऑन-साइट आवाजातून प्रेरित आहे. प्रख्यात गायक विशाल ददलानी यांचा उत्कट आवाज त्यांच्या कामाप्रतीच्या जिव्हाळ्याला व्यक्त करतो. शेवटी, प्रत्येक स्वप्नातील घरामागे, असे असंख्य हात आहेत जे कौतुकास पात्र आहेत.”
विशाल ददलानी म्हणाले:“आपली घरे उभारणाऱ्या बांधकाम मजुरांचे आपण फार क्वचित आभार मानतो , खरतरं मानतही नाही , तेही असे लोक जे कोणतीही अपेक्षा न ठेवता आपलं घर बनवत राहतात. जेव्हा सुगी ग्रुपने मला कामगार दिनानिमित्त बांधकाम मजुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या खास गाण्यासाठी आवाज द्यायला सांगितलं, तेव्हा मी मनापासून भारावून गेलो.
या गाण्याला खरी उर्जा मिळते त्यांच्या रोजच्या कष्टांच्या ठेक्यातून, जसे हातोड्यांचे ठोके, ड्रिल मशीनचा गडगडाट, रॅमर आणि शीअर्सचे आवाज. या खऱ्या आवाजांनी गाणं जसं वास्तवाशी जोडलेलं आहे, तसंच ते प्रत्येक मजुराच्या श्रमाची गोष्टही सांगतं. या गाण्यासाठी माझा आवाज देणं केवळ एक संगीतात्मक निर्णय नव्हता, तर एक भावनिक अनुभव सुद्धा होता.”
तीन दशकांहून अधिकचा अनुभव आणि १६ दशलक्ष चौरस फूटांहून अधिक यशस्वी प्रकल्पांची घडामोड,
या पाठीशी सुगी ग्रुपचा एकच विश्वास आहे आणि तो म्हणजे इमारती नव्हे, तर नाती घडवणं. आज, जेव्हा सुगी ग्रुप अरब देशांमध्ये सुद्धा आपला विस्तार करत आहे, तेव्हा त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे एकच तत्त्व आहे जिथे घर उभारलं जातं, तिथे विश्वासही उभा राहायला हवा.
या कामगार दिनी, सुगी ग्रुपकडून बांधकाम मजुरांना त्यांच्या घामाच्या प्रत्येक थेंबाला वाहिलेली एक मनापासूनची सलामी आहे आणि त्या असंख्य हातांना दिलेली एक सुरांनी सजलेली, प्रेमाने भरलेली कृतज्ञतेची साद आहे ज्यांनी लाखो स्वप्नांना आकार दिला आहे.