*मुंबईकरांनो सज्ज व्हा! सगळ्यात मोठं पॉप कल्चर सेलिब्रेशन, मुंबई कॉमिक कॉनचं*
*12- 13 एप्रिल रोजी शहरात पुनरागमन*
मुंबई कॉमिक कॉन 2025 आणखी एक अविस्मरणीय वीकेंडचा अनुभव देण्यासाठी सज्ज, कॉमिक्स, कॉसप्ले, गेमिंगसह चाहत्यांसाठी अनोखी पर्वणी
मुंबईकर पॉप कल्चरचं धमाल सेलिब्रेशन अनुभवण्यासाठी सज्ज, आकर्षक परफॉर्मन्सेस आणि कॉसप्लेजचा समावेश
*मुंबई, भारत – 03 एप्रिल 2025* – देशभरात साजऱ्या झालेल्या थरारक सीझननंतर कॉमिक कॉन इंडिया आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आणि बहुप्रतीक्षीत एडिशनसाठी – मारूती सुझुकी एरिना मुंबई कॉमिक कॉन 2025, पॉवर्ड हाय क्रंचीरोल, साठी सज्ज आहेत. हा कार्यक्रम 12- 13 एप्रिल रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी येथे आयोजित करण्यात आला आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या या वर्षाच्या कॉमिक कॉन सीझनचा ग्रँड फिनालेमध्ये पॉप कल्चरचा अनोखा अनुभव मिळणार असून त्यात आंतरराष्ट्रीय आणि भारतीय कॉमिक क्रिएटर्स, खास परफॉर्मन्सेस, कॉमिक्स, गेमिंग व अनेमेचं खास विश्व यांचा समावेश असेल. प्रवेश केल्यानंतर व्हिजिटर्सना इमेज कॉमिक्सचे रॅडिएंट ब्लॅक क्रमांक 1 च्या इश्यू, येन प्रेसचे सोलो लेवलिंग पोस्टर आणि खास कॉमिक कॉन इंडिया बॅग मिळेल. सुपरफॅन्सना एक्सक्लुसिव्ह कलेक्टिबल पॅक मिळणार असून त्यात मार्वलच्या डॉ. डूमचे बस्ट, डेडपूल आणि वुल्वरिन टी- शर्ट व कीचेन, कॉमिक कॉन इंडिया पझल, हिरोचे केप व इतर डिस्नी लायसन्सिंगच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या गुडीजचा समावेश असेल.
मुंबई कॉमिक कॉन चाहत्यांना जगभरातील त्यांच्या आवडत्या कॉमिक क्रिएटर्सना भेटण्याची व त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी देईल. त्यामध्ये कोनान द बार्बेरियनचे प्रसिद्ध लेखक तसेच मार्वल, डीसी, डिने आणि कॅपकॉमसाठी लक्षणीय काम केलेले जिम झब तसेच रॉब डेनब्लायकर- जगभरात नावाजल्या गेलेल् सायनाइड आणि हॅपीनेस फ्रँचाईझीचे को- क्रिएटर आघाडीवर आहेत. त्याशिवाय भारतातील प्रसिद्ध कॉमिक बुक क्रिएटर्सही हजेरी लावणार असून त्यात अभिजीत किनी स्टुडिओज, इंडसव्हर्स, चॅरियट कॉमिक्स, याली ड्रीम क्रिएशन्स, गार्बेज बिन, ग्राफिकरी, राजेश नागुलाकोंडा, बुल्सआय प्रेस, लिलरॉश, आर्ट ऑफ सॅव्हियो, कॉरपोरट, हॅपीफ्लफ, यु अँड व्ही वर्क्स, अर्बन टेल्स, बकारामॅक्स, टॅडेम ग्याडू, सौमिन पटेल या व अशा इतरांचा समावेश असेल.
कॉमिक्सबरोबर मुंबई कॉमिक कॉनमध्ये मनोरंजनाचा खजिना असेल आणि तो भारतातील मनोरंजनाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या मुंबईसाठी अगदी योग्य असेल. स्टँड- अपपासून संगीत आणि गेमिंगपर्यंत हे शहर लाइव्ह इव्हेंट्स आणि पॉप कल्चर अनुभवांसाठी प्रसिद्ध आहे. साहजिकच सर्वोत्तम परफॉर्मन्सेससाठी यासारखं दुसरं स्टेज नाही. स्टँड- अप क्षेत्रातील दिग्गज रोहन जोशी, साहिल शहा, बिश्वा कल्याण रथ, राहुल दुआ व द इंटरनेट सेड सो (टीआयएसएस) वरूण ठाकूर, कौतुक श्रीवास्तव, नेविल शहा आणि अदर मलिक त्यांच्या जबरदस्त आणि अनफिल्टर्ड विनोदासह धमाल उडवून देतील. त्याशिवाय गीक फ्रुट आणि डिपेंडंट आर्टिस्ट आपल्या कमालीच्या संगीताने अनोखे वातावरण तयार करतील. शिवाय मूझ X अफ्सर आणि जगप्रसिद्ध डीजे काझू हे मनोरंजन असंच अखंड सुरू ठेवतील.
चाहत्यांना इथए व्हॉइस ओव्हर सेशनचा वन्स-इन-अ-लाइफटाइम अनुभव घेता येईल. त्यामध्ये जपानी व्हॉइस अॅक्टर, कपैई यामागुची आणि हिरोआकी हिराता हे उसॉप व सांजी यांना वनपीसमध्ये आवाज देणारे कलाकार सहभागी होणार आहेत.
इमर्सिव्ह एक्सपिरीयन्सेसमुळे ही एडिशन आणखी खास होणार आहे. इथे वॉर्नर ब्रदर्स, डिस्ने, सोनी, बंदाई नाम्को, पेंग्विन रँडम हाउस इंडिया, यामाहा रेसिंग, मारूती सुझुकी एरिना आणि क्रंचीरोल एक्सपिरीएन्शल झोन उभारणार आहेत. नॉडविन गेमिंग एरिनामध्ये गेमिंगचा प्रीमियम अनुभव आणि प्लेस्टेशन, लेनेव्हो, लॉगिटेकचे एक्सक्लुसिव्ह शोकेस अनुभवता येणार आहेत. चाहत्यांना चांद्रयानचा व्हीआर अनुभवही घेता येणार आहे. हा थरार आणखी वाढवण्यासाठी इंडी गेम उत्सव मुंबईत पर्दापण करत 40 उच्च दर्जाचे मेड-इ-इंडिया पीसी व कन्सोल गेम्स स्पॉटलाइट करणार आहेत. त्यांना देशातील वेगाने वाढत असलेल्या गेमिंग कम्युनिटीची जबरदस्त प्लॅटफॉर्मसह ओळख करून दिली जाणार आहे. इट्स अ गर्ल थिंग (आयजीएटी) सिस्टरहूड सेलिब्रेशन, सक्षमता आणि कलात्मक अभिव्यक्ती मुंबई कॉमिक कॉन 2025 मध्ये आणत हा सीझन अविस्मरणीय करण्यासाठी सज्ज आहेत.
कॉमिक कॉन इंडियाचे संस्थापक जतिन वर्मा म्हणाले, ‘मुंबई शहराने कायमच पॉप्युलर कल्चर आपलेसे केले आहे. कॉमिक कॉन इंडिया सीझनच्या ग्रँड फिनालेनिमित्त आम्ही सर्वोत्तम कॉमिक क्रिएटर्सना एकत्र आणत वेगळआ अनुभव मिळवून देणार आहोत. यातून प्रत्येक चाहत्याला अविस्मणीय अनुभवता येतील अशी खात्री आहे. डाय- हार्ड कॉमिक बुक प्रेमींपासून गेमिंगप्रेमीं व अनिमे सुपरफॅनपर्यंत सर्वांना वेगळ्या पातळीवरचे फॅनडम अनुभवता येणार आहे. मुंबईकरांनी या फिनालेसाठी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत हे सेलिब्रेशन खऱ्या अर्थाने लेजंडरी करावे यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’
नॉडविन गेमिंगचे सह- संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अक्षत राठी म्हणाले, ‘स्टोरीटेलिंग आणि सर्जनशीलतेमधील मुंबईचा वारसा लक्षात घेता कॉमिक कॉनच्या या सीझनची सांगता करण्यासाठी मुंबईसारखे दुसरे ठिकाण नाही. हा कायमच आमच्या सर्वात उत्साहवर्धक शोजपैकी एक राहिला आहे आणि आम्ही तो नव्या उंचीवर नेण्याचे ठरवले आहे. नवीन एक्सपिरीएन्शल झोनपासून कापैई यामागुची व हिरोआकी हिराता यांच्यासह एक्सक्लुसिव्ह वन पीस सेशनपर्यंत तसेच मोठ्या ब्रँड्सच्या सहभागापर्यंत इथं प्रत्येक चाहत्यासाठी अनोख्या अनुभवाची निर्मिती करण्यात आली आहे. हा फिनाले सर्व कक्षा रूंदावत या मॅक्सिमम सिटीमध्ये पॉप कल्चर भव्य आणि सर्वोत्तम पद्धतीनं साजरा करेल.’
भेट द्या District By Zomato किंवा Comic Con India इथे 12 व 13 एप्रिल रोजी, जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी येथे होत असलेल्या मुंबई कॉमिक कॉन 2025 ची तिकिटे बुक करण्यासाठी क्लिक करा.