श्रेया चौधरीने वर्ल्ड थिएटर डे निमित्त आठवणींना दिला उजाळा .
अभिनेत्री श्रेया चौधरी हिने वर्ल्ड थिएटर डेच्या निमित्ताने आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने चार्ली चॅप्लिन आणि चिटी चिटी बँग बँग मधील ट्रुली स्क्रंपशस यांचे वेश परिधान केलेल्या लहानपणीच्या छायाचित्रांची झलक दिली आहे.
थिएटरबद्दलची तिची जुनी आणि खोलवर रुजलेली प्रेमभावना या पोस्टमधून स्पष्ट होते. या खास फोटोंमध्ये श्रेया एका गोड आठवणीचा भाग म्हणून चार्ली चॅप्लिनसारखा लुक घेऊन दिसत आहे, तसेच चिटी चिटी बँग बँगमधील तिच्या लुकनेही चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
वर्ल्ड थिएटर डेच्या निमित्ताने श्रेया म्हणाली,"थिएटर हा मानवी संस्कृतीतील सर्वात जुना आणि प्रभावी कला प्रकार आहे. स्टेजवर एक अभिनेता अभिनय करत असो किंवा ऑर्केस्ट्रा संगीत वाजवत असो—थिएटर हा अनुभव नेहमीच अविस्मरणीय राहतो. मी लहानपणापासून नाटकं पाहत मोठी झाले, आणि त्याचा माझ्या आयुष्यावर अमिट प्रभाव पडला. चार्ली चॅप्लिन किंवा चिटी चिटी बँग बँग मधील भूमिकांसाठी वेशभूषा करताना, मला कधीच कल्पना नव्हती की हे मजेशीर क्षण माझ्या थिएटरप्रेमाची पायाभरणी करतील.
आज मी जे काही करते, त्याचं श्रेय थिएटरलाच जाते. चित्रपट आणि वेबशोज करण्याआधी मला अभिनयाची खरी जाणीव स्टेजवरच झाली. माझ्या शालेय जीवनातील पहिला थिएटर परफॉर्मन्स आजही माझ्यासाठी सर्वात आनंदी दिवसांपैकी एक आहे. एक अंतर्मुख मुलगी असल्याने, त्या क्षणी मला पहिल्यांदा खरी आत्मविश्वासाची जाणीव झाली."
श्रेया ने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले "काही बालपणीची स्वप्ने कधीच फिकट होत नाहीत, ती फक्त एक मोठा मंच शोधतात. ❤️ हॅप्पी #WorldTheatreDay!"
Instagram Link - https://www.instagram.com/p/DHsQ8CAqswR/?igsh=MTVuNXV0eGs0eWR6aQ==
श्रेया चौधरी सध्या बंदिश बँडिट्स 2 आणि द मेहता बॉईज यांसारख्या प्रोजेक्ट्समध्ये तिच्या सशक्त अभिनयासाठी खूप प्रशंसा मिळवत आहे.