*‘शूलेश’ लघुपटाची राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी वाटचाल!
राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय १९ पुरस्कारांवर मोहर!*
सामाजिक आशयावर भाष्य करत, वास्तवाचे अचूक चित्रण सादर करणाऱ्या ‘शूलेश’ या लघुपटाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली उत्तम ओळख निर्माण केली आहे. उत्तम कथा - पटकथा, प्रभावी दिग्दर्शन आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर हा लघुपट विविध नामांकित चित्रपट महोत्सवांमध्ये चमकला असून, आतापर्यंत एकूण १९ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे.
या यशात लघुपटाच्या लेखिका आणि निर्मात्या स्मिता खोडे यांचे मोलाचे योगदान असून, त्यांच्या कल्पक लेखन आणि प्रभावी पटकथेने या लघुपटाला अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कथा व पटकथा पुरस्कार मिळवून दिले आहेत. तसेच, लघुपटाचे दिग्दर्शक सचिन गायकवाड यांनी आपल्या कल्पक आणि परिणामकारक दिग्दर्शनाने लघुपटाला वेगळ्या उंचीवर नेले असून, त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
लघुपटातील बालकलाकार माहीर रघुवंशी याने आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षक आणि समीक्षकांची मने जिंकली आहेत. त्याला विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून सन्मान मिळाला आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार व सन्मान:
ब्रुसेल्स वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हल (Brussels World Film Festival) – सर्वोत्कृष्ट लघुपट
अॅकोलेड ग्लोबल फिल्म कॉम्पिटिशन (Accolade Global Film Competition) – सर्वोत्कृष्ट लघुपट व लक्षवेधी भारतीय शॉर्ट फिल्म.
इंडो-दुबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IndoDubai International Film Festival) – सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपट.
वॉशिंग्टन फिल्म अवॉर्ड (Washington Film Award) – सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक व सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार विजेता
गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धा २०२४ (Goa International Film Competition 2024) – सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार
क्योटो इंडिपेंडंट फिल्म फेस्टिव्हल (Kyoto Independent Film Festival) – सर्वोत्कृष्ट लघुपट
भूतान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. (Bhutan international film festival ) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन व सर्वोत्कृष्ट कथा.
कलानगरी कोल्हापूर फिल्म फेस्टिव्हल २०२४ (Kalanagari Kolhapur Film Festival 2024) – सर्वोत्कृष्ट कथा व सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार
स्वप्नपूर्ती फिल्म फेस्टिव्हल (Swapnpurti Film Festival) – सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार
नायगारा फॉल्स आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव (Niagara Falls International Short Festival) – उपांत्य फेरी निवड
सध्या उपांत्य फेरीत असलेले महत्त्वाचे महोत्सव:
बर्लिन इंडी फिल्म अवॉर्ड (Berlin Indie Film Award) (अंतिम निकाल मार्च २०२५ मध्ये जाहीर होणार)
सॅन फ्रान्सिस्को आर्टहाऊस शॉर्ट फेस्टिव्हल (San Francisco Arthouse Short Festival)
सिडनी इंडी शॉर्ट फेस्टिव्हल (Sydney Indie Short Festival)
स्टॉकहोलम शॉर्ट फिल्म फेस्टिवल (Stockhlom short film festival )
लंडन वूमन फिल्म फेस्टिवल =(Londan women film festival )
अधिकृत नामांकन मिळालेले महोत्सव:
सांस्कृतिक कलादर्पण - पाच नामांकणे
गडीमा शॉर्ट फेस्टिव्हल (GADIMA Short Festival)
स्क्रीन लाइट अवॉर्ड (Screen Light Award)
स्पॉट लाईट फौंडेशन फिल्म फेस्टिवल (Spot light film foundation )
तांत्रिक व कलात्मक टीम:
लेखिका व निर्मात्या: स्मिता खोडे
दिग्दर्शक: सचिन गायकवाड
कॅमेरामन :- रितेश गुप्ता
संकलन: अंश कुमार (चेन्नई)
कला दिग्दर्शन: सुनील देवळेकर
पब्लिसिटी डिझाईन - संदेश गायकवाड
संगीत: सिद्धार्थ हजारे
रंगभूषा - देविदास सरकटे
कास्टिंग - सुरज सिंग मास फिल्म
सह दिग्दर्शक - रामचंद्र चव्हाण
निर्मिती प्रमुख - पंकज गांगण
मुख्य कलाकार:
समीर विजयन
सुगंधा शर्मा
माहीर रघुवंशी
मनीष सिसोदिया
समीर रावसाहेब
तुषार पांडे