Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ठरलं तर स्वप्नील जोशीचा गुजराती चित्रपट शुभचिंतक या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला !

 ठरलं तर स्वप्नील जोशीचा गुजराती चित्रपट शुभचिंतक या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला ! 


मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार स्वप्नील जोशीचा गुजराती चित्रपट शुभचिंतक ३० मे २०२५ रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीला 



२०२४ वर्ष संपता संपता स्वप्नील ने त्याचा आगामी गुजराती चित्रपटाची घोषणा केली होती. मराठी चित्रपट विश्व गाजवल्या नंतर आता स्वप्नील गुजराती प्रेक्षकांना देखील आपलंसं करण्यासाठी सज्ज होत असताना नुकतीच या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. ३० मे २०२५ रोजी स्वप्नीलचा " शुभचिंतक "सिनेमा गृहात प्रदर्शित होणार असल्याचं कळतंय !


स्वप्नीलचा हा पहिला वहिला गुजराती चित्रपट असून तो यात मुख्य भूमिका साकारणार आहे आणि आता नक्की या चित्रपटाची कथा काय हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. स्वप्नील कायम त्याच्या अपवादात्मक अभिनय पराक्रमासाठी आणि अष्टपैलुत्वासाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे आणि तो नक्कीच गुजराती प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणार यात शंका नाही. 


वैविध्यपूर्ण भूमिका आणि सातत्यपूर्ण काम करून तो कायम अनपेक्षित आणि ग्राउंडब्रेकिंग दोन्ही भूमिका अगदी उत्तमपणे साकारताना दिसतो. शुभचिंतक मध्ये स्वप्नील सोबत राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री मानसी पारेख सोबत पहिल्यांदा स्क्रीन स्पेस शेयर करणार आहे. 


2024 वर्षात स्वप्नील ने बॅक टू बॅक चित्रपट करून प्रेक्षकांचं नॉन स्टॉप मनोरंजन केलं आणि २०२५ वर्षात देखील तो अनेक प्रोजेक्ट्स मधून दिसणार आहे. स्वप्नीने नुकतंच " चिकी चिकी बुबुम बुम" या कॉमेडी चित्रपटातून प्रेक्षकांचं खळखळून हसुवून मनोरंजन केलं. येणाऱ्या काळात स्वप्नील पुन्हा निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार असून " सुशीला- सुजीत " मध्ये अभिनेता निर्मात्या या दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. 



"शुभचिंतक" हा चित्रपट एक डार्क कॉमेडी थ्रिलर असून स्वप्नीलचा हा पहिला बहुभाषिक चित्रपट आहे. मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा स्वप्नील आता गुजराती प्रेक्षकांना मंत्रमुग्ध नक्कीच करेल. 

मराठी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार स्वप्नील आता गुजराती चित्रपट विश्वात दमदार पाऊल ठेवून कमालीचा अभिनय करणार आहे यात शंका नाही ! स्वप्नीलने चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील आपल्या अविस्मरणीय कामगिरीने कायम प्रेक्षकांचे सातत्याने मनोरंजन केले आहे आता शुभचिंतक या नव्या गुजराती चित्रपटाची कथा काय ? तो काय भूमिका साकारणार हे ३० मे २०२५ रोजी चित्रपटगृहात जाऊनच बघायला लागणार आहे.


https://www.instagram.com/share/BAR-CVW5jA

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.