Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*'सखा माझा पांडुरंग' या मालिकेची पत्रकार परिषद कराड मधील संत सखूबाईंच्या मंदिरात पार पडली*

 *'सखा माझा पांडुरंग' या मालिकेची पत्रकार परिषद कराड मधील संत सखूबाईंच्या मंदिरात पार पडली* 



'सन मराठी' वाहिनीवर संत सखुबाई यांच्या जीवनावर आधारित 'सखा माझा पांडुरंग' ही नवी मालिका येत्या १० मार्चपासून सोमवार ते रविवार सायंकाळी ७.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या मालिकेची पत्रकार परिषद संत सखुबाई मंदिर, कराड येथे पार पडली. या परिषदेत 'सखा माझा पांडुरंग' या मालिकेत नरोत्तम ही भूमिका साकारणारे अभिनेते सुनील तावडे, सखू  ही भूमिका साकारणारी बालकलाकार स्वराली खोमणे, पांडू ही भूमिका  साकारणारा बालकलाकार रेवांत काकडे, मालिकेचे प्रोड्युसर संगीत कुलकर्णी व रुची कुलकर्णी, लेखक प्रसाद ठोसर व 'सन मराठी' वाहिनीची टीम उपस्थित होती. संपूर्ण महाराष्ट्रात महिला संत सखूबाईंचं एकमेव मंदिर हे  कराड येथे आहे. या मंदिरात पोहचताच कलाकारांनी संत सखूबाईंच्या मंदिराबद्दल माहिती जाणून घेतली व कलाकारांच्या हस्ते विठ्ठल रुख्मिणीची आरती पार पडली. 


या पत्रकार परिषदेत खास पत्रकार मंडळींसाठी 'सखा माझा पांडुरंग' या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित करण्यात आला. कराडच्या नगरपरिषदेच्या शाळेत 'सखा माझा पांडुरंग' या मालिकेच्या टीमने विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आले. 

*याचनिमित्ताने मालिकेचे प्रोड्युसर संगीत कुलकर्णी  म्हणाले की,* "मालिका करताना अनेक कथानक डोळ्यासमोर असतात पण आपल्या महाराष्ट्राला वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभला आहे. कुठूनही  विठ्ठलाचं नामस्मरण केलं की, विठुराया आपल्या मदतीला धावून येतोच. आजपर्यंत आपण कधी महिला संत सखुबाई यांच्याबद्दल फारस ऐकलं नव्हतं. आताच्या पिढीला संतांबद्दल माहिती मिळावी. हाच आमचा उद्देश आहे. ही मालिका फक्त वारकरी संप्रदाय नाही तर प्रत्येक प्रेक्षकाला आवडेल ही खात्री आहे."



*नरोत्तम ही भूमिका साकारणारे अभिनेते सुनील तावडे म्हणाले की,* "सर्वप्रथम 'सन मराठी' वाहिनी, मालिकेचे प्रोड्युसर संगीत कुलकर्णी, लेखक प्रसाद ठोसर यांचे मी मनापासून आभार मानतो.संत सखुबाई यांच्याबद्दल मला फारशी माहिती नव्हती पण या मालिकेच्या माध्यमातून संत सखुबाई यांची महती जाणून घ्यायला मिळणार आहे. मालिकेचा पहिला भाग बघताना मला स्वतःच्या भूमिकेचा खूप राग आला. पण नाकारात्मक भूमिका म्हंटलं तर त्या भूमिकेचा प्रेक्षकांना राग आला तर नक्कीच कलाकाराची मेहनत फळास लागते."

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.