Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अभिनेता स्वप्नील जोशी मागतोय ओरडून मदत नक्की काय हे प्रकरण बघा...

 अभिनेता स्वप्नील जोशी मागतोय ओरडून मदत नक्की काय हे प्रकरण बघा...

स्वप्नील आणि सोनाली ने मागितली प्रेक्षकांची मदत ! 


असं काय बरं घडल असेल की मराठी चित्रपट सृष्टी मधल्या या दोन कलाकारांना ओरडून प्रेक्षकांची मदत घ्यावी लागली असले ? सध्या सोशल मीडिया वर सुपरस्टार अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या दोघांचा एक व्हिडिओ चर्चेत आहे आणि त्याला कारण देखील तेवढच खास आहे व्हिडिओ मध्ये दोघे ओरडून हेल्प असं सांगतात ! हे प्रकरण नक्की काय हे बघायला त्यांनी प्रेक्षकांना चक्क सिनेमा गृहात बघायला बोलवलं आहे. 



आता मदत मागता मागता या दोन कलाकारांनी प्रेक्षकांना हाकेचा आवाज तर दिला आहे पण हे प्रकरण काय नक्की घडतंय काय हे बघायला प्रेक्षकांना 18 एप्रिल ची वाट बघावी लागणार आहे कारण निर्माता अभिनेता स्वप्नील जोशी चा नवा कोरा चित्रपट " सुशीला - सुजीत " प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यांनी प्रेक्षकांना या व्हिडिओ मधून त्यांनी चित्रपटाची एक खास झलक त्यांनी या निमित्ताने शेयर केली असून हा चित्रपट नक्कीच चित्रपट गृहात काहीतरी गोंधळ घालणार आहे असं दिसतंय. 


चित्रपटात सुजीतची भूमिका स्वप्नील साकारत असून फक्त अभिनय न करता निर्मात्याच्या खुर्चीत देखील स्वप्नील दिसणार आहे आणि म्हणून हा चित्रपट स्वप्नील साठी खास आहे. सुशीला - सुजीत मध्ये स्वप्नील दुहेरी भूमिका  साकारताना दिसणार आहे. नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी वेगळं बघायला मिळाव आणि त्यांचं निखळ मनोरंजन करावं या साठी स्वप्नील वैविध्यपूर्ण भूमिका साकारतो आणि या चित्रपटात देखील त्याची वेगळी आणि लक्षवेधी भूमिका असल्याचं कळतंय. 


सुशीला सुजीत सोबतीने स्वप्नील येणाऱ्या काळात अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स मध्ये तर दिसणार आहे पण तो त्याचा पहिल्या वहिल्या गुजराती चित्रपटात देखील मुख्य भूमिका साकारणार आहे.

https://www.instagram.com/share/BAVgasNagv

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.