*अखेर ५ मार्चची उत्सुकता संपली, प्रशांत नाकतीचं‘नौलखा हार’ गाण करणार राडा*
*’नौलखा हार’ गाण्यातून आयुष संजीवचं दिग्दर्शन आणि नृत्यदिग्दर्शनात पदार्पण*
*प्रशांत नाकतीच्या ‘नौलखा हार’ गाण्यात निक शिंदे आणि रितेश कांबळेचा धमाका तर आयुष संजीवच्या दिग्दर्शन आणि नृत्यदिग्दर्शनाची चर्चा*
*अपघातानंतरही कामाशी एकनिष्ठ असणाऱ्या आयुष संजीवच्या दिग्दर्शन आणि नृत्यदिग्दर्शनाची‘नौलखा हार’ गाण्यात कमाल*
५ मार्चला नक्की काय आहे?, नक्की काय होणार आणि नक्की काय नवीन येणार आहे याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आणि आता प्रेक्षकांच्या या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे कारण पाच मार्चला येणार नव गाण साऱ्यांच्या दिलाचा ठोका चुकवायला सज्ज होणार आहे. हो ५ मार्च आला म्हणजे प्रशांत नाकती यांच्या गाण्याची पर्वणी ऐकायला मिळणार हे नक्की. ‘माझी बाय गो’, ‘आपलीच हवा’, ‘हार्टब्रेक झाला’ आणि करोडोंच्या घरात व्ह्यू असलेलं ‘नखरेवाली’ या प्रशांत नाकतीच्या गाण्यांची अक्षरशः धुमाकूळ घातला आहे, यांत भर घालत आता यंदाचा ५ मार्चही अधिक रंगतदार होणार आहे कारण प्रशांत नाकती यांचे ‘नौलखा हार’ हे नव कोर गाण रसिकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या गाण्याचा प्रोमो गाण्याची उत्सुकता वाढवत आहे. या गाण्याची आणखी एक खासियत म्हणजे हे गाणं दिग्दर्शित करणारा आणि नृत्यदिग्दर्शित करणारा आपला सर्वांचाच मराठमोळा असा अभिनेता, दिग्दर्शक आयुष संजीव आहे.
आयुष संजीव याने आजवर मालिका विश्वात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत छोटा पडदा गाजवला. आयुष संजीव पहिल्यांदाच नव्याकोऱ्या गाण्याच्या दिग्दर्शनाची आणि नृत्यदिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. निक शिंदे, रितेश कांबळे, अदिती इंगळे आणि तनू भोसले अभिनीत ‘नौलखा हार’ हे गाण रसिकांना थिरकायला भाग पाडत आहे. आयुष पहिल्यांदा या गाण्यामुळे दिग्दर्शन क्षेत्रात उतरला असून त्याला नृत्याची आवड होती हे आधीपासूनच साऱ्यांनाच माहीत आहे. मात्र दिग्दर्शनातही आता तो त्याचा ठसा उमटवायला सज्ज झाला आहे. तर हे सुंदर अस गाणं आशिष कुलकर्णी आणि सोनाली सोनावणे या दोघांनीही त्यांच्या सुमधुर स्वरात स्वरबद्ध केलं आहे. तर संपूर्ण गाण्याच्या संगीत दिग्दर्शनाची धुरा प्रशांत नाकती आणि संकेत गुरव यांनी उत्तमरित्या पेलवली आहे.
नुकत्याच या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान आयुषबरोबर एक मोठी दुर्घटना घडली मात्र यातूनही त्याने मार्ग काढत शूटिंग पूर्ण केले. त्याच्या या अपघाताच्या बातमीने त्याच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसेल. ‘नौलखा हार’ गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान आयुषचा अपघात झाला आणि या दरम्यान त्याला दुखापत झाली असल्याचं समोर आले. घाटकोपर येथे गाण्याच्या चित्रीकरण्यादरम्यान आयुष संजीव खाली पडला आणि त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. ही दुखापत होऊनही आयुष काही थांबला नाही तर याउलट त्याने त्याच्या गाण्याच्या संपूर्ण दिग्दर्शनाची आणि नृयदिग्दर्शनाची जबाबदारी उत्तमरीत्या पेलवली. याबाबत बोलताना आयुष म्हणाला, “प्रशांत नाकती यांनी मला ही संधी दिली त्यासाठी सर्वप्रथम त्यांचे आभार. दिग्दर्शनात माझे हे पदार्पण असताना या गाण्याच्या टीमने माझ्यावर विश्वास दाखवला ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. चित्रीकरणादरम्यान माझ्यावर आलेल्या संकटाचा मी विचार न करता माझ काम १००% देण्यासाठी मी कायम तत्पर राहिलो कारण सगळ्यांचा विश्वास जपण मला महत्त्वाच वाटल. लवकरच गाण येत आहे आणि आशा करतो की, हे गाण तुम्हाला नक्की आवडेल”.
लवकरच हे गाणं रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, त्यामुळे पाच मार्चला नेमका कोणता धुमाकूळ सोशल मीडियावर होणार याकडे साऱ्यांच्याच नजरा लागून राहिल्या आहेत. प्रशांत नाकती यांचं संगीत असलेले हे गाणं नक्कीच चाहत्यांच्या मनावर राज्य करेल यांत शंकाच नाही.