*स्वामी तारक मंत्राने पाणी अभिमंत्रित होणार अलौकिक लीलेचा दिव्य प्रत्यय येणार !*
पहा महागुरुवार, 'जय जय स्वामी समर्थ' 6 मार्च रोजी, रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर.
मुंबई ६ मार्च, २०२५ - कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत स्वामी तारकमंत्राने पाणी अभिमंत्रित होणार असून अलौकिक लीलेचा दिव्य प्रत्यय येणार आहे. सध्या मालिकेत तारकमंत्राची सध्या कथन केली जात असलेली महती सध्या विशेष चर्चेत आहे. तारकमंत्राने अनाथ गौरीच्या उद्धाराची गोष्ट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली, तारकमंत्राच्या महतीचा पुढचा टप्पा सध्या मालिकेत सुरू असून पैश्यांशिवाय उपचार करणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या एका वैदयाला धडा शिकवताना तारकमंत्र अभिमंत्रित पाण्याची महती स्वामी सांगत आहेत. त्यातली महत्त्वाची स्वामी लीला येत्या ६ मार्चच्या महागुरुवारच्या भागात रात्री आठ वाजता उलगडणार आहे.
तेव्हा पहा महागुरुवार, 'जय जय स्वामी समर्थ' 6 मार्च रोजी, रात्री 8 वा. फक्त कलर्स मराठीवर.