Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्टार प्रवाहच्या कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेतून वैभव मांगले येणार भेटीला

 स्टार प्रवाहच्या कोण होतीस तूकाय झालीस तू! मालिकेतून वैभव मांगले येणार भेटीला

तब्बल १० वर्षांनंतर मालिका विश्वात करणार दमदार पुनरागमन

 


स्टार प्रवाहवर लवकरच भेटीला येणाऱ्या कोण होतीस तूकाय झालीस तू मालिकेचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. कोकणातील नयनरम्य दृष्य आणि सरसर नारळाच्या झाडावर चढणारी कावेरी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. कावेरीच्या वडिलांची म्हणजेच मुकुंद सावंत ही भूमिका साकारणार आहे सुप्रसिद्ध अभिनेता वैभव मांगले. जवळपास १० वर्षांनंतर ते पुन्हा एकदा टेलिव्हिजन विश्वात पुनरागमन करत आहेत.

या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना वैभव मांगले म्हणाले, मी जवळपास दहा वर्षांनंतर मालिकेत काम करतोय त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे. कोण होतीस तूकाय झालीस तू मालिकेची गोष्ट कोकणात घडते. कोकणावर माझं विशेष प्रेम आहे. मालिकेचं बरचसं शूटिंग कोकणात होणार आहे. कोकणातली माणसं आणि त्यांच्या भाषेत एक वेगळा गोडवा आहे. 



मला वाटतं कोणतीही प्रांतिक गोष्ट करताना त्या भागातल्या भाषेचे लहेजा जपायला हवा. मालिकेच्या प्रोमोमधून याची झलक पाहायला मिळतेय. मुकुंद सावंत ही व्यक्तिरेखा मी साकारत आहे. मुकुंदचं त्याच्या मुलीवर म्हणजेच कावेरीवर प्रचंड प्रेम आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर मुलीचं संगोपन करण्यासाठी त्याने बरेच कष्ट घेतले. कावेरीला त्याने आपल्या हक्कांसाठी लढायला शिकवलं आहे. ज्या संस्कृतीमध्ये आपण वाढलो त्याला कधी पाठी सोडू नये अश्या विचारांचा मुकुंद आहे. नातेसंबंधांची खूप छान गोष्ट या मालिकेतून पाहायला मिळेल. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका कोण होतीस तूकाय झालीस तू लवकरच फक्त स्टार प्रवाहवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.