Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*रंगभूमी ते ओटीटी : मराठी नाट्यसृष्टीला डिजिटल माध्यमांतून नवीन दिशा!*

 *रंगभूमी ते ओटीटी : मराठी नाट्यसृष्टीला डिजिटल माध्यमांतून नवीन दिशा!*



*मुंबई, 26 मार्च २०२४ –* सिनेमा आणि ओटीटीच्या प्रभावामुळे नाटक मागे पडेल असं अनेकांना वाटत होतं, पण तसं झालं नाही. उलट, आता डिजिटल काळातील रंगभूमी नव्या पायरीवर पोहोचतेय. समांतर नाट्यप्रवाह, एकांकिका, डिजिटल थिएटर आणि इमर्सिव्ह थिएटर यांसारख्या नव्या संकल्पनांमुळे रंगभूमीला नवसंजीवनी मिळतेय. आणि या 'वर्ल्ड थिएटर डे' निमित्त आपण भूतकाळ आणि भविष्य दोन्ही जपण्याचा संकल्प करूया! कारण ‘तिसरी घंटा, पुन्हा एकदा’! या खास उपक्रमात, ती खास तिसरी घंटा पुन्हा वाजणार आणि प्रेक्षकांना ७० हून अधिक भन्नाट मराठी नाटकांचा आनंद डिजिटल माध्यमातून अल्ट्रा झकास ओटीटी वर अनुभवता येणार आहे.


कधीकाळी विजय चव्हाण, लक्ष्मीकांत बेर्डे, रमेश भाटकर, प्रदीप पटवर्धन, निळू फुले, अविनाश खर्षीकर, अतुल परचुरे, मच्छिंद्र कांबळी यांसारख्या दिग्गज कलाकारांनी आपल्याला रंगभूमीवरून खळखळून हसवलं, विचार करायला लावलं आणि मनात कायमचं स्थान निर्माण केलं. मात्र, आज त्यांची जिवंत अभिनयशैली, प्रेक्षकांना बांधून ठेवण्याची ताकद पुन्हा अनुभवता येईल असं वाटत नव्हतं. पण अल्ट्रा झकास मराठी ओटीटीच्या मदतीने हे शक्य झालेलं आहे.



ही सर्व नाटके प्रामुख्याने विनोदी असली तरी त्यामधून महत्त्वाचे सामाजिक आणि सांस्कृतिक संदेश मिळतात.  ‘श्रीमंत दामोदर पंत’ ही गोष्ट एका स्वातंत्र्यसैनिक श्रीमंत दामोदरपंतांची. ‘यदा कदाचित’ माणसाच्या लोभाच्या प्रवृत्तीवर मार्मिक टीका करते. ‘जाऊ बाई जोरात’ स्त्रीसशक्तीकरणाचा संदेश देते. ‘कुमारी गंगूबाई मॅट्रिक’ शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक प्रतिष्ठेवरील विचार मांडते. ‘चाळ नवाची खट्याळ वस्ती’ मुंबईतील चाळसंस्कृती आणि शेजारधर्माचे सुंदर दर्शन घडवते. ‘Double Cross’ नाट्यातून मानवी मनातील गूढ आणि गुंतागुंतीचे नातेसंबंध उलगडले जातात. ‘मागणी तसो पुरवठो’ (मालवणी नाटक) कोकणी-मालवणी संस्कृतीच्या खास शैलीत सादर होते. ‘सगळे सभ्य पुरुष’ ही कथा समाजातील पुरुषप्रधान मानसिकतेवर भाष्य करते. ‘सूर्यास्त’ सामाजिक वास्तवाचे आणि संघर्षाचे प्रतिबिंब दाखवते.


ही नाटके प्रेक्षकांना हसवताना समाजातील विसंगती, नातेसंबंधांतील जिव्हाळा आणि वास्तवाची जाणीव करून देतात. आजच्या डिजिटल युगात मुलं स्टँड-अप कॉमेडी, यूट्यूब, आणि डेली व्ह्लॉग्स पाहण्यात अधिक रमलेली दिसतात. पण आपण त्यांना 'जुनं ते सोनं' याचा अनुभव द्यायला हवा. त्यांना दाखवायला हवं की आपल्या मराठी नाट्यसृष्टीत किती महान कलाकार होऊन गेले आणि त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर किती गारूड केलं. आपण नव्या पिढीला घेऊन नाटकाच्या या जुन्या आणि नव्या प्रवासात सामील करूया.



मराठी रंगभूमीचा वारसा पुढे नेण्यासाठी अल्ट्रा झकास Marathi OTT  एप्रिल महिन्यात विशेष डिजिटल उपक्रम घेऊन येत आहे. या उपक्रमात तरुण प्रेक्षकांना मराठी रंगभूमीच्या समृद्ध वारशाशी जोडण्याचा प्रयत्न असेल. सोबतच सोशल मीडिया स्पर्धा, ऑनलाइन चर्चा आणि डिजिटल प्रमोशन्सच्या माध्यमातून अल्ट्रा झकास मराठीच्या पेजद्वारे रंगभूमीप्रेमींना सहभागी होता येईल. यामुळे प्रेक्षकांना जुन्या काळातील गाजलेली नाटकं पुन्हा आठवता येतील आणि रंगभूमीचा मनसोक्त आनंद घेता येईल.


अल्ट्रा मीडिया आणि एंटरटेनमेंटचे सी. ई. ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, "यंदाच्या 'वर्ल्ड थिएटर डे' निमित्त मराठी नाटकांचं भूतकाळातील वैभव आणि भविष्याच्या नव्या संधी दोन्ही जपूया कारण नाटक हे केवळ स्टेजवरचं कलेचं माध्यम नाही, तर ते आपल्या संस्कृतीचं आणि माणसामाणसातील नात्यांचं एक जिवंत रूप आहे. ‘तिसरी घंटा पुन्हा एकदा’ मधून आपण जुनं सोनं आजच्या पिढीपर्यंत पोहोचवतो आहे , जेणेकरून आपला नाट्यवारसा असाच टिकून राहील.”



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.