प्राइम व्हीडिओ’च्या वतीने बहुप्रतीक्षित हॉरर थ्रीलर फ्रेंचायझी छोरी-2 च्या प्रीमियर तारखेची घोषणा; 11 एप्रिल रोजी लाँच होणार
टी-सिरीज, एबंडेंशिया एंटरटेनमेंट, साईक, अँड तमारिस्क लेन प्रॉडक्शन, ही बहुप्रतीक्षित सिक्वेल विशाल फूरिया दिग्दर्शित आहे
भय-थराराने परिपूर्ण असलेल्या या सिनेमात प्रमुख भूमिकेत नुशरत भरूचा आणि सोहा अली खान झळकणार; सोबत मुख्य भूमिकांमध्ये गश्मीर महाजनी, सौरभ गोयल, पल्लवी अजय, कुलदीप सरीन आणि हार्दिका शर्मा
भारतात प्राइम मेंबर तसेच जगभर सुमारे 240 देश-प्रदेशांतील प्रेक्षक 11 एप्रिल रोजी छोरी 2 पाहू शकणार, प्राइम व्हीडिओवर खास
अनाऊन्समेंट लिंक: https://www.instagram.com/
मुंबई, भारत, 25 मार्च: प्राइम व्हीडिओ या भारताच्या सर्वाधिक प्रेमास-प्राप्त एंटरटेनमेंट डेस्टिनेशनच्या वतीने आज त्यांच्या बहुप्रतीक्षित छोरी 2 या हॉरर थ्रीलरच्या ग्लोबल प्रीमिअर डेटची घोषणा केली. पाठीच्या कण्याला सुन्न करणारी कथा आणि खोलवर रुजलेल्या लोककथांनी प्रेक्षकांवर कायमस्वरूपी ठसा उमटवणाऱ्या 'छोरी'च्या अभूतपूर्व यशानंतर, या सिनेमाचा पुढचा भाग अलौकिक शक्ती आणि सामाजिक वाईट गोष्टींविरुद्ध आईच्या लढ्याच्या रोमांचक कथेसह अलौकिक भय-थरारपट, भीती आणि रहस्याच्या सीमा विस्तारण्याचे वचन देतो. विशाल फूरिया दिग्दर्शित 'छोरी 2’ हा टी-सीरिज, एबंडेंशिया एंटरटेनमेंट, साईक आणि तामारिस्क लेन प्रॉडक्शनचा सिनेमा आहे. पुन्हा एकदा साक्षीच्या व्यक्तिरेखेत नुशरत भरुचा झळकणार असून तिच्यासोबत मुख्य भूमिकेत सोहा अली खान दिसणार आहे. तसेच गश्मीर महाजनी, सौरभ गोयल, पल्लवी अजय, कुलदीप सरीन, आणि हार्दिका शर्मा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. छोरी 2 हा खास प्रीमिअर भारत तसेच जगभरातील सुमारे 240 देश-प्रदेशांतील प्रेक्षकांसाठी 11 एप्रिल 2025 रोजी प्राइम व्हीडिओवर खास होईल.
“आम्ही “छोरी” या सिनेमाद्वारे प्रेक्षकांना एका अशा कथेची ओळख करून दिली, जी खूप रंजक असली तरी भावनिकदृष्ट्या शक्तिशाली होती. या सिनेमाने भयपटांच्या शैलीशी परिपूर्ण जुळवून घेतले आणि लोककथांमध्ये भीतीचे मिश्रण ताजे आणि अस्सल वाटले”, असे प्राइम व्हीडिओ इंडियाचे कंटेंट लायसेंसिंगचे डायरेक्टर मनीष मेंघानी यांनी सांगितले. "आम्ही छोरी 2 सह, त्या सर्जनशील दृष्टिकोनास पुढे नेत आहोत, अधिक गडद, अधिक तीव्र आणि अधिक वळणे असलेल्या सुप्रसिद्ध फ्रँचायझीचा पुढचा अध्याय तयार करीत आहोत. आम्ही प्राइम व्हीडिओमध्ये, आमच्या कथाकथनाची क्षितिजे विस्तृत करण्यासाठी वचनबद्ध आहोत. तसेच या दिशेने भयपटाने आमच्याकरिता एक अविश्वसनीय रोमांचक जागा निर्माण केली आहे. पुन्हा एकदा एबंडेंशिया एंटरटेनमेंट, टी-सीरिज आणि साईकसोबत काम करून एक नवीन मापदंड घडवणारी तसेच सिनेसृष्टीला पुढे नेणारी कलाकृती सादर करणे हा एक विशेषाधिकार आहे.”
एबंडेंशिया एंटरटेनमेंटचे संस्थापक आणि चीफ एक्झिक्युटीव्ह ऑफिसर विक्रम मल्होत्रा म्हणाले, “छोरी'च्या यशाने एक गोष्ट निश्चित झाली की जेव्हा कथानक बळकट असते, तल्लख वातावरणात रुजलेले असते तेव्हा भयपटाचा ठसा प्रेक्षकांवर खोलवर उमटतो. सिनेमाच्या पहिल्या भागावरील प्रचंड प्रेम आणि कौतुकाने आम्हाला “छोरी 2”सह कथेचा आणखी विस्तार करण्यास प्रोत्साहन दिले. जिथे भयपट अधिकच तीव्र होतो आणि जगण्याची लढाई अधिक वैयक्तिक आणि धोकादायक बनते. विशालच्या नेतृत्वाखाली, पुन्हा एकदा, साक्षीच्या भूमिकेत नुशरत आणि सोहा यापूर्वी प्रेक्षकांनी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहेत. आम्ही या मनोरंजक कथेतील पुढील अध्यायाकरिता चाहत्यांना आणखी वाट पाहायला लावणार नाही.”