Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*अवतरणार... आई तुळजाभवानीचे ‘महाकाली रूप’ !*

 *अवतरणार... आई तुळजाभवानीचे ‘महाकाली रूप’ !*



आई तुळजाभवानी मालिकेचा महारविवार विशेष भाग २३ फेब्रुवारी दु. १२ आणि संध्या ७. ०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.


*मुंबई २० फेब्रुवारी, २०२५ :* कलर्स मराठीवरील “आई तुळजाभवानी” या मालिकेत देवींसाठी पृथ्वीवर येऊन भवानीशंकर रूपात राहिलेले महादेव आणि आपल्या आई-वडिलांना एकत्र आणण्यासाठी धडपडणारे बालगणेश आणि अशोकसुंदरी हा गोष्टीचा टप्पा अंतिम चरणात आहे. हा टप्पा कसा उलगडणार,देवींना महादेवांचे सत्य कसे कळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. 



भवानी शंकरच महादेव आहेत हे कळल्यावर मालिका कुठले नवे वळण घेणार आहे. बालगणेश आणि अशोकसुंदरीने, देवींसाठी तुळजापुरात वाड्याची निर्मिती करण्याची विनंती करण्यामागची प्रेरणा आईवडिलांना एकत्र आणावी हीच होती. या वाड्याची निर्मिती त्यापाठोपाठ कल्लोळ तीर्थ, गायमुख तीर्थ यांच्या निर्मिती मागची गोष्ट प्रेक्षकासमोर उलगडत असतानाच देवीला भवानीशंकर यांच्या रूपाबद्दल येणारी शंका आणि अखेर महादेवांचे खरे रूप नाट्यमयरित्या उघड होणे हा अत्यंत रोमहर्षक कथाभाग गुरुवार २० फेब्रुवारी ते शनिवार २२ फेब्रुवारीच्या भागांमध्ये दररोज रात्री नऊ वाजता उलगडणार आहे, याचा कळससाध्य येत्या रविवार २३ फेब्रुवारीच्या महाएपिसोड मध्ये होणार असून महादेव आणि संपूर्ण कुटुंबाने सत्य लपवल्याने व्यथित झालेल्या देवीच्या रागात महिषासुराने केलेल्या आगळीकीने भर पडणार आहे आणि आई तुळजाभवानीचे आजवर कधीही न पाहिलेले न भूतो न भविष्यति महाकाली रूप प्रेक्षकांना दिसणार आहे. तेव्हा नक्की पहा आई तुळजाभवानी मालिकेचा महारविवार विशेष भाग २३ फेब्रुवारी दु. १२ आणि संध्या ७. ०० वा. आपल्या कलर्स मराठीवर. 

 


 *याबाबत बोलताना पूजा काळे म्हणाली,* "मालिकेमध्ये एक नवं वळण येणार आहे प्रेक्षकांना आई तुळजाभवानीचे महाकाली रूप पाहायला मिळणार आहे. हे रूप हुबेहूब साकारण्यासाठी म्हणजेच मेकअप, आभूषणे, पेहराव हे सगळे मिळून मला ३-४ तासांचा कालावधी लागला. वेगवेगळ्या प्रकारचे हार, मुकुट  घालून पाहिले कारण आम्हांला कुठल्याही प्रकारची कसर सोडायची नव्हती. माझी अशी नाही पण संपूर्ण टीमची यामागे अफाट मेहेनत होती... मी पहिल्यांदाच असं रूप धारण करत होते त्यामुळे दडपण होतंच, पण मला ऊर्जा मिळतं गेली आणि मी तसं काम करत गेली. मला आशा आहे तुम्हाला देखील आवडेल."


महिषा सुराची ही आगळिक कोणती? देवीला व्यथित करणारे भवानीशंकरांचे सत्य कोणते ? आणि आई तुळजाभवानीचे महाकाली रुपाचे प्रयोजन काय? हे जाणून घेण्यासाठी आई तुळजाभवानीचा महारविवारचा भाग आवर्जून पहावा असा आहे. तेव्हा नक्की पहा आई तुळजाभवानी मालिकेचा महारविवार विशेष भाग २३ फेब्रुवारी दु. १२ आणि संध्या ७. ०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.