‘अल्फा’साठी शर्वरीची दमदार तयारी, बॅटल रोप्स वर्कआउटने दिला मंडे मोटिव्हेशन!
2024 हे शर्वरीसाठी एक गेम-चेंजर वर्ष ठरले आहे. मुंजा या ₹100 कोटींच्या ब्लॉकबस्टरपासून, जागतिक पातळीवर गाजलेल्या 'महाराज' आणि थरारक वेदा नंतर, शर्वरी आता तिच्या सर्वात मोठ्या प्रोजेक्टसाठी सज्ज होतेय – वायआरएफ च्या स्पाय युनिव्हर्स मधील 'अल्फा' साठी !
आलिया भट्ट सोबत शूट करत असताना, शर्वरीच फिटनेस लेव्हल सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. नुकतंच तिनं सोशल मीडियावर तिच्या इंटेन्स बॅटल रोप्स वर्कआउट ची एक झलक शेअर केली आणि लिहिलं, “आज बॅटल रोप्स, लवकरच #अल्फा साठी पूर्ण युद्धसज्ज 💥💣 #MondayMotivation”
पोस्ट इथे पाहा: https://www.instagram.com/p/DGclObdzScu/?igsh=MWR3Y3kwc2h0bDZ1NQ%3D%3D
‘द रेल्वे मेन’ फेम शिव रवैल दिग्दर्शित ‘अल्फा’ २५ डिसेंबर २०२५ रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. शर्वरीची ‘गर्ल-नेक्स्ट-डोअर’मधून अॅक्शन स्टारकडे होणारी झपाट्याने वाटचाल खरोखरच प्रेरणादायी आहे!