Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*सप्तसूर म्युझिकच्या म्युझिक व्हिडिओ निर्मितीची शंभरी*

*सप्तसूर म्युझिकच्या म्युझिक व्हिडिओ निर्मितीची शंभरी*


*'कोई आनेवाला है' हा शंभरावा म्युझिक व्हिडिओ लाँच*

*व्हिएतनाम येथे चित्रित झाले 'कोई आनेवाला है'*



मराठी संगीत क्षेत्रात म्युझिक व्हिडिओ हा प्रकार गेल्या काही वर्षांत सप्तसूर म्युझिकने पुनरुज्जीवित केला आहे. सप्तसूर म्युझिकने म्युझिक व्हिडिओ निर्मितीमध्ये शंभरीचा टप्पा गाठला असून, गायिका  शयोनी बागची यांच्या "कोई आनेवाला है" या गाण्याचा शंभरावा व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे.


साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांच्या सप्तसूर म्युझिकने मराठी संगीत विश्वात सातत्याने वेगळ्या पद्धतीचे काम करत अनन्यसाधारण ओळख निर्माण केली आहे. म्युझिक व्हिडिओ या प्रकारात रोमँटिक म्युझिक व्हिडिओसह गणेशोत्सव, बोलीभाषांमधील गाण्यांच्या व्हिडिओची निर्मिती केली आहे. त्यामुळे सप्तसूर म्युझिकला सर्वदूर प्रतिसाद मिळाला आहे. या युट्यूब चॅनेलला ८०  हजार सबस्क्रायबर्स आहेत. 



"कोई आनेवाला है" या शंभराव्या म्युझिक व्हिडिओतील गाणं गायिका शयोनी बागची यांनी गायलं आहे.  विकास चौहान यांनी गीतलेखन, आकाश रिजिआ यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. म्युझिक व्हिडिओचं छायांकन रोहन कंटक, संकलन जान्हवी लाड यांचं आहे. व्हिएतनाम येथील नितांतसुंदर डोंगराळ परिसरात हा म्युझिक व्हिडिओ चित्रित करण्यात आला आहे. त्यामुळे सप्तसूर म्युझिकचा शंभर म्युझिक व्हिडिओच्या निर्मितीची वाटचाल एकूणच संगीत क्षेत्राला, नवोदितांना दिशा देण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे.


*Song Link*


https://youtu.be/oSyGzMgN94g?si=7Jziqcpk33pH-sKL



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.