Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*आता पुन्हा कल्ला होणार... कारण तो परतोय !*

 *आता पुन्हा कल्ला होणार... कारण तो परतोय !*

*रितेश देशमुखसोबत होणार बिग बॉस मराठीचा खास धमाका !*

*पहा १० फेब्रुवारीपासून दररोज दु. ३ वा. आपल्या कलर्स मराठीवर.*



 *मुंबई ४ फेब्रुवारी, २०२५ :* संपूर्ण महाराष्ट्रात मनोरंजनाचा बाप म्हणून ओळखला जाणारा एकमेव मराठी नॉन फिक्शन शो म्हणजे "बिग बॉस मराठी" . जगभरात खळबळ माजवणारा, अनेक देशांमधून करोडो प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवलेला, संपूर्ण भारतामध्ये हुकुमत गाजवणारा कार्यक्रम म्हणजे “बिग बॉस मराठी ” हा कार्यक्रम येत आहे हे कळल्यावर या कार्यक्रमबद्दलच्या बऱ्याच चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरु होतात. या रिऍलिटी शोने पहिल्या पर्वापासून संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. मग तो बिगचा आवाज असो, बिग बॉसच्या घरातील छोट्या मोठ्या गोष्टी वा किस्से असो... हे सगळे लोकांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये चर्चेचा विषय झाले. बिग बॉस मराठी सिझन ५ च्या पर्वाने अपार लोकप्रियता मिळवली. हा सिझन सुरु होण्याआधी अनेक चर्चा देखील रंगल्या.  स्पर्धक कोण असेल ? बिग बॉसचे घर कसे असेल ? सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे याचं सूत्रसंचालन कोण करेल ? कुठलाही रिऍलिटी शो असो त्या कार्यक्रमाचा सूत्रधार म्हणजे प्रेक्षक आणि स्पर्धकांना जोडणार दुवा असतो असे म्हणतात... 




'बिग बॉस'च्या घरातील सदस्य आणि प्रेक्षक यांच्यामधील दुवा हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा सुपरस्टार रितेश देशमुख असणार आहे कळल्यावर महाराष्ट्र काय तर सगळ्यांच्याच नजरा शो कधी सुरु होणार याकडे लागल्या होत्या. बिग बॉस मराठीच्या या सीझनप्रमाणेच रितेश भाऊलाही महाराष्ट्रासह जगभरातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. पाहता पाहता हा महाराष्ट्राचा नंबर वन नॉन फिक्शन शो ठरला. रितेश भाऊची लयभारी स्टाईल, नावीन्य, तरुणपण, कल्ला या सर्वच गोष्टींमुळे हा सीझन गाजला रितेशच्या 'भाऊच्या धक्क्या'ने टीआरपीचे उच्चांक गाठले तो आता परत येतोय तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी १० फेब्रुवारीपासून दररोज दु. ३ वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.