Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संस्कृतीच्या करेज या इंग्लिश चित्रपटाचा सँटो डोम्निगो यूएसएला फिल्म फेस्टीवल मध्ये झालं खास स्क्रिनिंग !

 संस्कृतीच्या करेज या इंग्लिश चित्रपटाचा सँटो डोम्निगो यूएसएला फिल्म फेस्टीवल मध्ये झालं खास स्क्रिनिंग !


संस्कृतीच्या या चित्रपटाची साता समुद्रापार चर्चा !

म्हणून मला करेज सारखा चित्रपट करायचा होता - संस्कृती बालगुडे ! 



फॅशन, नृत्य आणि अभिनयात कायम चर्चेत असलेली अभिनेत्री संस्कृती बालगुडे ही कायम कमालीच्या आणि तितक्याच आव्हानात्मक भूमिका करताना आजवर दिसली आहे. संस्कृती सध्या एका फिल्म साठी चर्चेत आहे आणि हे कारण देखील तेवढं खास आहे तिच्या करेज या इंग्लिश चित्रपटाची सँटो डोम्निगो यूएसएला फिल्म फेस्टीवल मध्ये निवड झाली असून या चित्रपटाच खास स्क्रिनिंग तिकडे पार पडलं. करेज हा तिचा पहिला वहिला इंग्रजी  चित्रपटाच असून ती या चित्रपटाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी गेली आहे. 


संस्कृतीची ही खास सफर नक्की कशी आहे या बद्दल बोलताना संस्कृती म्हणते " एक मराठी मुलगी एवढ्या मोठ्या फिल्म फेस्टीवल मध्ये सहभाग घेते आणि आपल्या भारताच प्रतिनिधित्व करते याचा खूप अभिमान आहे. खूप छान वाटतंय आपल्यावर एक मोठी जवाबदारी आहे याचं थोड प्रेशर देखील आहेच पण हा अनुभव नक्कीच खूप कमालीचा आणि मस्त असणार आहे आणि मी यासाठी उत्सुक आहे. करेज चित्रपट अंकुर काकतकर यांनी दिग्दर्शित केला असून डॉ उदय देवस्कर आणि सुशांत तुंगारे यांनी या खास चित्रपटाची निर्मिती केली आहे. आपण एकदा तरी वुमन ओरिएंटेड चित्रपट करावा ही इच्छा असताना करेज सारखा चित्रपट माझ्या वाट्याला येणं हे भाग्याचं आहे. ( कंट्री ऑफ हॉनर ) सेक्शन मध्ये आमच्या या फिल्मच स्क्रिनिंग होतंय आणि आम्ही चित्रपटाच प्रतिनिधित्व करणार आहोत"



संस्कृती ने आजवर अनेक विषयावर आधारित चित्रपट करून त्यात लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. कायम काय वेगळेपणा असलेल्या भूमिका करू शकतो याकडे तिचा कल असतो हे यातून बघायला मिळतं. संस्कृतीचा हा पहिला वहिला इंग्रजी चित्रपट असला तरी अगदी साता समुद्रापार तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. 


जगभरात संस्कृतीच्या "करेज" या इंग्रजी चित्रपटाची चर्चा तर आहे पण येणाऱ्या काळात संस्कृती अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार आहे हे बघण देखील तितकच उत्कंठावर्धक ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.