Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*घराघरातील लाडकी पारू झाली आहे महाराष्ट्राची लाडकी मॉडेल.*

*घराघरातील लाडकी पारू झाली आहे महाराष्ट्राची लाडकी मॉडेल.*



महासंगमनंतर ‘पारू’ मालिकेत दररोज काही ना काही घडामोडी घडताना दिसत आहेत. नु *कतंच ह्या मालिकेने १ वर्ष पूर्ण केलंय, यानिमित्ताने मालिकेच्या सेटवर सेलिब्रेशन करण्यात आलं आणि सेलिब्रेशनचं अजून एक कारण होत ते म्हणजे घराघरातील आपली लाडकी पारू होणार आहे महाराष्ट्राची लाडकी मॉडेल.* हो हे खरं आहे पारू पुन्हा एकदा किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड अँबेसेडर होणार आहे.तर झालं असं पारू धाडसाने अनुष्काला सामोरे जाऊन ठामपणे घोषित करते की "पंधरा दिवसांच्या आत मी तुला किर्लोस्कर घरातून बाहेर फेकून देईन!" यामुळे दोघींच्या शत्रुत्वाला आणखी धार येणार आहे आणि पारू थेट अनुष्काला आव्हान देते. इकडे दिशा किर्लोस्कर उद्योगसमूहाविरुद्ध प्रतिस्पर्धी कंपनी सुरू करते, ज्यामुळे त्यांच्या व्यवसायाला मोठा धोका निर्माण होतो. अहिल्या चिंतेत आणि विचारात आहे की आदित्य या कठीण स्पर्धेला कसा सामोरा जाईल. 



अनुष्का पारू आणि आदित्यच्या नात्यातली माहिती गोळा करू लागते, पारूविरुद्ध काहीतरी सबळ पुरावा मिळवण्याचा प्रयत्न करते. पारू मात्र अनुष्काला तिच्याच पद्धतीने उत्तर देते. तिच्या निर्भीड आणि बिनधास्त स्वभावाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. तिचा हा नवा अवतार तिच्या वाढलेल्या आत्मविश्वासाचे प्रतीक ठरतो.‘ पारुला’ पुन्हा एकदा दिमाखात किर्लोस्कर कंपनीची ब्रांड अँबॅस्डर बनवण्यासाठी एक कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे.* अनुष्काचा खरा चेहेरा आता पारू सर्वांसमोर आणणार आहे. अनुष्काचा खरा चेहेरा समोर आल्याने पारु आणि अनुष्का मध्ये सुरु झालेय अस्तित्वाची लढाई. 



दिशा जेलच्या बाहेर आल्याने तिने आव्हान दिलं आहे अहिल्या किर्लोस्करला. *आता या पोस्टर रिव्हिल समारोहात दिशा आणि अनुष्काच नातं सगळ्यांसमोर येईल ? दिशा ने किर्लोस्कर कुटुंब संपवण्याचा रचलेला डाव यशस्वी होईल? या समारंभात दिशा ने ठेवलेला बॉम्ब पारु आणि आदित्य करतील का डीफ्युज की ह्या सगळ्यात जाईल कोणाचा जीव ? या सगळ्याच्या उत्तरांसाठी पाहायला विसरू नका पारू दररोज संध्या. ७.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.