Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*शिबीरसाठी सूर्या आणि तुळजा जाणार तुरुंगात*

*शिबीरसाठी सूर्या आणि तुळजा जाणार तुरुंगात*

*सूर्या आणि त्याच्या आईची भेट होणार का?*



*'लाखात एक आमचा दादा'* मालिकेत जालिंदरच्या घरातील पार्टीत गोंधळ झाल्यानंतर, सूर्या त्याच्या बहिणींना घरी घेऊन येतो. दुसऱ्या दिवशी, बहिणींनी त्याला त्याची चूक लक्षात आणून देताच, आपण तुळजावर जास्तच अन्याय केल्याचं त्याच्या लक्षात येत. सूर्या, तुळजाची माफी मागण्यासाठी विविध प्रयत्न करतोय. पण तुळजा खूप दुखावली गेली आहे. त्यातच डॅडी तुळजासमोर एक ऑफर ठेवतात. पण तेजूच्या समजूतदारपणानंतरच तुळजा जालिंदरच्या ऑफरला नकार देते. दरम्यान, सूर्याचे  माफी मागण्याचा प्रयत्न सुरूच आहेत. इकडे धनूला भेटायला एक भावी वर येत असल्याची माहिती मिळते . सूर्या काळजीत आहे कारण तुळजाशिवाय पाहुणे लग्नाचा प्रस्ताव नाकारू शकतात. हताश होऊन, तो शालन, मालन आणि इतरांमार्फत माफी मागण्याचा प्रयत्न करतो आणि तुळजाला किमान धनूचा लग्नाची बोलणी होईपर्यंत तरी थांबण्याची विनंती करतो. पाहुणे तुळजाच्या अनुपस्थितीबद्दल विचारपूस करतात.



 जालिंदर सूर्या आणि तुळजामधील संघर्ष उघड करणार तेवढ्यातच तुळजा दारात येते. तुळजा सूर्याला स्पष्ट करते की ती फक्त कार्यक्रमासाठी आली आहे. सूर्या, सगळं ठीक करण्याचा दृढनिश्चय करतो. तुळजाला वैद्यकीय शिबिरासाठी जेलमध्ये बोलावलं जातं. योगायोगाने, हे तेच जेल आहे जिथे सूर्याची आई आहे आणि जालिंदरला कळतं की ती पॅरोलवर सुटणार आहे. जालिंदरला हे ही समजलंय सूर्या तुळजा जेलमध्ये जाणार आहेत.   

 *आता जालिंदर सूर्या आणि त्याच्या आईची भेट टाळू शकेल? सूर्या आणि त्याच्या आईची तुरुंगात  भेट होईल? जाणून घेण्यासाठी बघत रहा 'लाखात एक आमचा दादा' दररोज रात्री ९:३० वा. फक्त आपल्या झी मराठी वाहिनीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.