Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आयुष्मान खुराना FICCI फ्रेम्सचे ब्रँड ॲम्बेसेडर; मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राचा चेहरा म्हणून निवड

 बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना FICCI फ्रेम्सचे ब्रँड ॲम्बेसेडर; मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राचा चेहरा म्हणून निवड  


बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आयुष्मान खुराना याची FICCI फ्रेम्सच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी नियुक्ती झाली आहे. भारतातील मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राचा चेहरा म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे. FICCI फ्रेम्स या भारताच्या अग्रगण्य जागतिक मीडिया आणि मनोरंजन संमेलनाने यंदा २५ वा वर्धापन दिन साजरा करण्याची घोषणा केली आहे. यंदाच्या विशेष वर्षासाठी , "राईस : रिडिफायनिंग इनोवेशन , सस्टेनेबिलिटी , एंड एक्सीलेंस"(RISE: Redefining Innovation, Sustainability, and Excellence) ही थीम ठरवण्यात आली आहे, जी उद्योगातील नाविन्यपूर्णता, टिकाऊपणा आणि उत्कृष्टतेचे महत्त्व अधोरेखित करते.



FICCI फ्रेम्सने गेल्या २५ वर्षांत उद्योगातील महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. आयुष्मान खुराना यांचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सहभाग हा या व्यासपीठाच्या प्रतिष्ठेची साक्ष देतो. हा वार्षिक कार्यक्रम मुंबईत आयोजित केला जातो आणि जगभरातील प्रभावशाली व्यक्ती, सर्जनशील व्यावसायिक, आणि धोरणकर्त्यांना एकत्र आणतो. मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख ट्रेंड, नवीन तंत्रज्ञान, आणि विविध आव्हानांवर चर्चा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.


FICCI फ्रेम्सच्या मंचावर आजवर जगभरातील दिग्गजांची उपस्थिती पाहायला मिळाली आहे. हॉलिवूड अभिनेता ह्यू जॅकमन, जेम्स मर्डोक, गॅरी नेल यांसारख्या आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्त्वांसह भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी, अझीम प्रेमजी यांचेही महत्त्वपूर्ण योगदान या मंचावर नोंदले गेले आहे. शाहरुख खान, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, आणि माधुरी दीक्षित यांसारखे बॉलिवूडचे मोठे तारेही या कार्यक्रमाचा भाग राहिले आहेत.


फिक्की फ्रेम्सच्या २५ व्या वर्षी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड झाल्यानंतर आयुष्मान खुराना म्हणाले, “फिक्की फ्रेम्सच्या या रौप्यमहोत्सवी वर्षात पहिला ब्रँड अॅम्बेसेडर होण्याचा सन्मान मिळाल्याचा मला प्रचंड अभिमान आहे. चंडीगडहून मुंबईत स्वप्न घेऊन येणाऱ्या एका तरुणासाठी हा प्रवास खरोखरच अद्भुत ठरला आहे. आज माझे काम केवळ लोकांपर्यंत पोहोचले नाही, तर भारताच्या पॉप संस्कृतीचा भाग झाले आहे. या नवीन भूमिकेत, मी आमच्या उद्योगाच्या उत्कृष्टतेचा आणि नाविन्याचा प्रचार करण्यासाठी FICCI  सोबत काम करण्यास उत्सुक आहे.”


या कार्यक्रमाचे नेतृत्व पूर्वी यश चोप्रा आणि करण जोहर यांनी केले होते. सध्या केविन वाझ यांच्या नेतृत्वाखालील FICCI फ्रेम्सचे आयोजन करण्यात येत आहे, तर सह-अध्यक्ष म्हणून संध्या देवनाथन आणि अर्जुन नोहवार यांची भूमिका आहे. या वर्षीच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल सामग्री निर्मिती, व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि मेटाव्हर्स यांसारख्या तंत्रज्ञानावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.


FICCI फ्रेम्सच्या २५ व्या वर्धापन दिनाला आयुष्मान खुरानाच्या सहभागामुळे विशेष महत्त्व लाभणार आहे. या सोहळ्यामुळे तंत्रज्ञान, नाविन्य, आणि जागतिक दृष्टीकोनाचे सुंदर मिश्रण अनुभवायला मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.