Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*आशु-शिवाची लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत !*

*या मकरसंक्रांतीत आशु आणि शिवाच्या नात्यात तिळगुळाचा गोडवा येईल ?*

*आशु-शिवाची लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत !*



*'शिवा'* मालिकेत नेहामुळे खूप घडामोडी घडताना दिसत आहेत. सीताईच्या दडपणाखाली आणि शिवाच्या आव्हानामुळे चिडलेल्या आशूने अखेर नेहाशी लग्न करणार असल्याची घोषणा केलेय. नेहा शिवाला सांगते की आशूने लग्नाला होकार दिला आहे. शिवा खूप आनंदित आहे तिला विश्वास असतो की आशूच्या  तिच्याविषयीच्या  भावना वाढतील. शिवा सगळ्यांना सांगते  की आशूची चांगल्या प्रकारे काळजी घ्या. दिव्या, शिवा आणि नेहाला एकत्र बोलताना पाहते. नेहा आशूसमोर शिवाच्या हावभावांची नक्कल करते, ज्यामुळे आशूच्या मनात शिवाचा विचार अधिकच पक्का होतो. आशूच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे.  दरम्यान, शिवा आणि आशू एका आजारी महिलेला वाचवण्यासाठी एकत्र येतात. या घटनेमुळे आशूला शिवाच्या प्रामाणिकतेवर विश्वास बसतो. 



याआधी आशु आणि शिवा कंपनीच्या बोर्ड मीटिंगसाठी म्हणून एकत्र येतात, त्यात शिवाचा मुद्दा भाऊ उचलून धरतात पण आशुला हे पटत नाही.आशु व शिवामध्ये या कारणावरून कडाक्याच भांडण होत, नेहा मध्ये पडून त्यांचे भांडण मिटवायच्या प्रयत्न करते.  पण लॉबीमधे सगळे कामगार शिवाच्या बाजूने उभे आहेत. आशुची चिडचिड होतेय आणि ह्याचाच किर्ति व सीताई फायदा घेतात. नेहाला काही करून आशु व शिवाचे भांडण मिटवायचं आहे.  हे सर्व सुरु असताना पाना गँग, मांजा आणि संपदा मिळून शिवाला एक सरप्राईज द्यायचे ठरवतात . सगळे मिळून मकरसंक्रांतीचा सण आणि पतंगोत्सव जल्लोषात साजरा करायचा निर्णय घेतात. 

 

*आता ही मकरसंक्रांत शिवा- आशु एकत्र साजरी करू शकतील? नेहा आणि आशूचं लग्न लावण्यात सीताई यशस्वी होईल का? यासाठी बघायला विसरू नका 'शिवा' दररोज रात्री ९:०० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.