*'सन मराठी'वरील 'जुळली गाठ गं' मालिकेतील सावीच पत्र वाचून भारावून गेल्या सिनेसृष्टीतील अभिनेत्री*
'सन मराठी'वर 'जुळली गाठ गं' ही नवी मालिका १३ जानेवारीपासून दररोज रात्री ८:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेतील सावीने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासाठी एक खास पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे सावीने लग्नानंतर नवऱ्याकडून तिच्या काय अपेक्षा आहेत ते सांगितलं आहे. हे पत्र वाचून सिनेसृष्टीतील काही अभिनेत्रींनीही त्यांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराचं कौतुक करत आठवणीत राहणारा एक किस्सा शेअर केला आहे.
*अभिनेत्री प्रार्थना बेहरे म्हणते* "सावीच पत्र पाहून मी खूप भारावून गेले आणि हे पत्र वाचून मला माझ्या आयुष्यातील एक प्रसंग आठवला. लग्नाआधी मी काकाकडे राहत होते. शुटिंगच्यानिमित्ताने मला लंडनला जावं लागलं. त्यादरम्यान माझ्या काकांचं निधन झालं असल्याचं आईने मला कळवलं,पण मला त्यावेळी तिथे पोहचता आलं नाही. त्या क्षणी मला माझ्या नवऱ्याने व सासरच्या माणसांनी सांगितलं, "आम्ही इथे आहोत तू अजिबात काळजी करू नकोस." त्यानंतर १० दिवसांनी नवऱ्याने लंडनला येऊन मला धीर दिला.मी घरी नसतानाही अभिषेकने माझ्या घरच्यांची काळजी घेतली. असा आदर, सन्मान, आणि काळजी घेणारा नवऱ्या प्रत्येक महिलेला मिळायला हवा. त्यामुळे सावीच्या पत्राशी मी सहमत आहे."
*अभिनेत्री योगिता चव्हाण म्हणते* "सावीने जसं या पत्रात लिहलंय अगदी त्याप्रमाणेच माझा नवरा आहे. आम्ही दोघेही मिळून घरातील काम करतो. काही दिवसांपूर्वी माझे बाबा घरी आले आणि त्यांनी सौरभला काम करताना पाहिलं. हे पाहून त्यांनी मला विचारलं हे असं का? तेव्हा सौरभने बाबांना समजावलं. त्यावेळी मला खूप छान वाटलं. प्रत्येक नात्यात असा आदर, सन्मान मिळायला हवा. जसं पत्रात सावी म्हणते तसंच मलाही म्हणायला आवडेल, नवऱ्याला असेल देवाचं स्थान तर बायकोला सुद्धा मिळायला हवा देवीचा मान"