Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पाथब्लेझर सई ताम्हणकर झाली पॅराग्लायडिंग पायलट !

 पाथब्लेझर सई ताम्हणकर झाली पॅराग्लायडिंग  पायलट !


आकाशाला गवसणी घालून सईच्या नव्या करीयरची आव्हानात्मक सुरुवात ! 

 व्हर्सेटाइल अभिनेत्री ते पॅराग्लायडिंग पायलट ! 



धाडसी वृत्तीने ती कायम चर्चेत राहणारी, बॉलिवूड मध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी आताच्या घडीची हायेस्ट पेड अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर ! सई तिच्या वेगवेगळ्या भूमिका मधून कायम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आली आहे पण ती आता अभिनयाच्या पलिकडे जाऊन चक्क. पॅराग्लायडिंग पायलट बनली आहे.


नवीन वर्षाची सुरुवात सई ने एकदम अडवेंचर ( Adventure )करत केली आणि या मागचं कारण देखील तितकच खास आहे तर सई सध्या पॅराग्लायडिंगच प्रशिक्षण घेत असून फक्त आवड म्हणून नाही तर पायलट होण्यासाठी सई याचं खास शिक्षण घेत आहे.


हिंदी इंडस्ट्रीत सध्या सई जोरदार काम करताना दिसत असली तरी एक अभिनेत्री ते तिच्या नव्या करीयरच्या वाटा ती तितक्याच आव्हानात्मक पद्धतीने पूर्ण करतेय. अभिनयाच्या पलिकडे जाऊन एवढं कमालीचं करीयर निवडण्याची ही प्रक्रिया कशी होती ? सईला पॅराग्लायडिंग पायलट का व्हावंस वाटलं या बद्दल बोलताना सई सांगते....



"कामशेत टेम्पल पायलट स्कूल मधून मी माझा पायलट कोर्सच प्रशिक्षण घेतलं आणि ही एक अशी शाळा आहे जिकडे कौशल्यपूर्ण गोष्टी शिकवल्या जातात. भारतातील ही सगळ्यात बेस्ट स्कूल आहे कारण तुमची सेफ्टी, तुमची शिकण्याची आवड या सगळ्यांचा विचार करून तुम्हाला योग्य ते प्रशिक्षण दिलं जातं. मला खूप वर्ष असं वाटतं होत आपण नवीन काही शिकलो नाही आहे म्हणजे रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण एवढे गुंतले जातो आणि मग अनेक गोष्टी कुठेतरी शिकायच्या राहून जातात आणि मग आपण नवीन काहीतरी शिकू शकतो का ? ते आपल्याला जमेल का ? असं वाटून जातं म्हणून गेले काही दिवस मी विचार करत होते आणि मग आव्हानात्मक स्पोर्ट्स ( अडवेंचेर स्पोर्ट्स ) हे आपल्याला जमत म्हणून पायलट होण्याचा विचार मनात आला. या आधी सुद्धा मी स्कायडायव्हिंग केलं आहे तर मला असं वाटलं की पॅराग्लायडिंग शिकायला काय हरकत आहे ! हा विचार मनात ठेवून मी हा कोर्स करायला गेले आणि पुन्हा एकदा एक माणूस म्हणून जगता आलं. असं म्हणतात प्रत्येक खेळ हा तुम्हाला खूप कमालीचा अनुभव देऊन जातो तसचं या खेळा मुळे मला अनेक सुंदर गोष्टी अनुभवता तर आल्या पण स्वतःहा बद्दल अनेक गोष्टीचा उलगडाया निमित्ताने झाला. स्वतःची क्षमता, मनस्तिथी काय आहे हे या स्पोर्ट्स मुळे समजलं जेव्हा तुम्ही एखादा खेळ शिकता तेव्हा या गोष्टी देखील तुम्ही आपसूक शिकत जाता आणि असं म्हणतात पॅराग्लायडिंग तुम्हाला हे शिकवत की ज्या गोष्टीची तुमच्यात कमी आहे त्या गोष्टीवर तुम्ही आपोआप काम करता आणि हे काम तुमच्या खेळण्यातून होत हे उत्तम आहे. पॅराग्लायडिंग पायलट व्हायचं होत असं अजिबात डोक्यात नव्हतं हा स्पोर्ट्स मला हटके वाटला आणि मी एखादी गोष्ट शिकायला घेते तेव्हा मला त्यात पुढे पुढे जायला आवडतं आणि ती गोष्ट अधिकाधिक आत्मसात करायला आवडते आणि म्हणून तितक्याच गांभीर्याने आवडीने मी ते शिकते. लोकांना कसं वाटत माथेरानला किंवा महाबळेश्वरला जाऊन कोणाबरोबर तरी बसून पॅराग्लायडिंग करून येतात तर थांबा हे तसं नाही तर मी नीट पॅराग्लायडिंग पायलटच प्रशिक्षण घेत आहे आणि माझ्यासाठी ही फक्त एक सुरुवात आहे"



एकंदरीत काय सईने नेहमीच आव्हानं पेलून काम केलं आहे अनेक रिस्क घेऊन त्यातून काहीतरी नवं करू पाहणाऱ्या सई ताम्हणकरची ही नवी बाजू प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आहे यात शंका नाही !

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.