*भावनाला, मिळाला सिद्धूच्या मदतीचा हात !*
*भावना रवीच्या तावडीतुन आनंदीला वाचवू शकेल ?*
'लक्ष्मी निवास' मालिका पाहिल्याभागापासूनच प्रेक्षकांच्या मनात घर करतेय. ही मालिका पहिल्या आठ्वड्यापासुनच चर्चेचा विषय ठरतेय. मालिकेत भावनाच लग्न मोडल्यामुळे घरात गोष्टी चिघळल्या आहेत. रवीला समजते की श्रीकांतने आपली सर्व मालमत्ता आणि वारस म्हणून आनंदीचं नाव जाहीर केलंय. त्यामुळे सरोज आणि रवी भावनाला आनंदीचे अपहरण केल्याची चुकीची माहिती पोलिसांना देतात. पोलिस भावनाला अटक करतात तेव्हा सुपर्णा, आनंदीला भावनाकडून घेते. पण भावनाला कोणत्याही अडचणीला सामोरे जाता येऊ नये म्हणून लक्ष्मी आणि श्रीनिवास स्वतः कारागृहात जातात. हे सर्व पाहून भावनाला अपराधी वाटतंय. तरीही ते सगळं विसरून भावना ऑफिसला जायला निघते. तिकडे सिद्धू आणि भावनाची नजरानजर होते.
भावना सिद्धूला आवडायला लागलेय. म्हणून तो पाठलाग करत असताना दळवींच्या घराजवळ आलाय. लक्ष्मी सिद्धूचं आदरातिथ्य करते, पण भावना आणि सिद्धूची चुकामुक होते. इकडे रवी आनंदीला त्रास देतोय आणि श्रीनिवास घरात सर्वांना सांगतो की भवनाच्या लग्नासाठी कर्ज घेतले आहे. हे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित होतात. भावना श्रीकांतच्या आईला आनंदीला सांभाळण्याचं दिलेलं वचन आणि कर्ज या कात्रीत सापडलेय.
आता भावना रवीच्या तावडीतुन आनंदीला वाचवू शकेल ? यासाठी भावनाच्या मदतीला कोण धावून येईल ? सिद्धूच्या मनात भावना बद्दलच्या भावना कळल्यावर ती काय असेल तिची प्रतिक्रिया ? यासाठी बघायला विसरू नका 'लक्ष्मी निवास' दररोज रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.