Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*सरकार सानिकाला मिळणार बाप्पाचा आशीर्वाद!*

 *सरकार सानिकाला मिळणार बाप्पाचा आशीर्वाद!* 

 *पहा # लय आवडतेस तू मला माघी गणेश जयंती विशेष भाग २ फेब्रुवारी दु. ३ कलर्स मराठीवर !* 



 *मुंबई २८ जानेवारी, २०२५ :* प्रेम म्हणजे यशस्वी आणि आनंदी जीवनाचा सूत्र...प्रत्येक नात्याचा पाया हा विश्वास आणि प्रेम असतो...सध्या मालिकेमध्ये सानिका आणि सरकारच्या आयुष्यात अनेक घटना घडत आहेत. पंकजा, सर्वेश आणि त्यात भर म्हणजे सईने रचलेल्या जाळ्यात सानिका अडकते आणि सरकारवर असलेल्या विश्वासाला तडा जातो. आणि तेव्हापासून दोघांचे नाते एका नाजूक वळणावर येऊन पोहचले होते. सानिका सरकारच्या गोड नात्याला सईची दृष्ट लागता लागता प्रेम शेवटी जिंकते असं म्हणायला हरकत नाही. ते म्हणतात ना प्रेम ही अत्यंत हवीहवीशी वाटणारी भावना आहे आणि त्यापेक्षा मोठी बाब या जगात कुठलीच नाही. खूप कट कारस्थानांना सामोरं जात अखेर सानिकाला झालेला गैरसमज दूर होतो आणि तिला विश्वास पटतो कि सरकारने तिला त्यांच्याबद्दलचे खरं सांगितले होते. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात लग्न ही खूप महत्वाची घटना असते... कारण यानंतर तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. ती स्वत:च घर सोडून दुसऱ्या घरी जाते...लवकरच सरकार आणि सानिका देखील बाप्पाच्या साक्षीने या बंधनात अडकणार आहेत. पण, त्याच दरम्यान साहेबराव त्यांचे लग्न मोडण्यासाठी देवळात येऊन सरकारवर गोळी झाडतात. सरकार सानिकाच्या लग्नातील विघ्न बाप्पा कसं दूर करणार ? आता पुढे नक्की काय होणार ? सानिका आणि सरकारचे नाते पुढे कुठल्या वळणावर येणार ?  या सगळ्या गुंतागुंतीच्या गोष्टीमधून नक्की मालिकेत पुढे काय घडणार ? हे बघणे रंजक असणार आहे. तेव्हा नक्की पहा # लय आवडतेस तू मला मालिकेचा माघी गणेश जयंती एका तासाचा विशेष भाग. २ फेब्रुवारी दु. ३ आणि संध्या. ७ वा. कलर्स मराठीवर ! 



मालिकेत आता बघायला मिळत आहे सरकार सानिकाला सई त्याच्या मामाची मुलगी आहे आणि तिला दोघांमध्ये दुरावा आणि वाद घडवून आणायचे आहेत म्हणून ती नाटक करतेय. सानिकाला सरकारचे म्हणणे पटते. सानिका सईला हाकलवायला जाते. सई सानिकावर हल्ला करते ते बघून साहेबराव रागाने सईला घराबाहेर काढतात. हे घडत असताना सानिका - सरकार यांच्या नात्याबद्दल सावित्रीला कळते.. सानिका सरकार सावित्रीसमोर प्रेमाची कबुली देतात .. याचे वाईट परिणाम दोघांना भोगायला लागतील म्हणून सावित्री त्यांना पळून जाण्याचा सल्ला देते. सावित्री समजावते सानिका आणि सरकारला पळून जाण्याशिवाय पर्याय नाही. सानिकाला सावित्रीची खंबीर साथ नेहेमीच मिळाली आहे आणि तिच्या साथीने सरकार - सानिका या अग्निदिव्यातून देखील बाहेर येणार का ? कसे या कठीण परिस्थितीला सामोरे जातील. हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. 


तेव्हा नक्की पहा # लय आवडतेस तू मला माघी गणेश जयंती विशेष भाग २ फेब्रुवारी दु. ३ आणि संध्या. ७ वा. कलर्स मराठीवर !

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.