Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*अभिनेत्री अश्विनी चवरे हिने ‘जिलबी’ चित्रपटाच्या सेटवर बनवली जिलेबी*

 *अभिनेत्री अश्विनी चवरे हिने ‘जिलबी’ चित्रपटाच्या सेटवर बनवली जिलेबी*


*जिलबी’ चित्रपट १७ जानेवारीला होणार प्रदर्शित, अभिनेत्री अश्विनी चवरेची खास गोड भेट!*




सध्या साउथचे सिनेमे जगभर धुमाकूळ घालत आहेत, आणि यामध्ये आता एक मराठमोळा चेहरा विशेष चर्चेत आला आहे. आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर छाप पाडणारी  आणि साउथमध्ये आपली ओळख निर्माण केलेली मराठमोळी अभिनेत्री अश्विनी चवरे सध्या प्रचंड चर्चेत आली आहे.


तिचा मराठीतला आगामी चित्रपट 'जिलबी'मध्ये एका दमदार भूमिकेत दिसणार असून .या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी,शिवानी सुर्वे हे कलाकार देखील या सिनेमा मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सेटवर अश्विनिने चक्क जिलेबी बनवण्याचा एक वेगळा अनुभव घेतला. सेटवरील हा जिलेबी बनवतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. अश्विनी चवरेच्या या व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे आणि तिच्या या मन मोकळ्या स्वभावाचे भरभरून कौतुक केले आहे. 



अश्विनीचा आगामी चित्रपट 'जिलबी' मधला दमदार अभिनय प्रेक्षकांना किती भावतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.‘जिलबी’ चित्रपट नेमका गोड आहे की गूढ, हे चित्रपट पाहताना प्रेक्षकांना अनुभवता येईल तसेच ‘जिलबी' हा चित्रपट येत्या १७ जानेवारीला चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटिस येणार आहे. अभिनेत्री अश्विनी चवरेने सेटवर बनवलेली जिलेबी तर गोड होती, परंतु ‘जिलबी' नक्की गोड की गूढ हे चित्रपटगृहात चित्रपट पाहतानाच प्रेक्षकांना समजणार आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.