पारूच्या आयुष्यातील संघर्ष, नात्यांची गुंफण उलगडणार!
आदित्य, पारू आणि अनुष्का यांच्या आयुष्यात येणाऱ्या अप्रत्यक्षित वळणांसाठी तयार राहा, कारण पारूच्या आगामी भागांमध्ये खूप काही घडामोडी घडताना दिसणार आहेत. पारूच्या वागणुकीतील अचानक बदलाने गोंधळलेला आदित्य हा तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय, परंतु मारुतीचा विरोध त्याला सहन करावा लागतो. मात्र अनुष्का पुन्हा एकदा मदतीला धावून येते आणि पारूला शूटसाठी परवानगी मिळवून देते. यानंतर आदित्य, पारूला अनुष्का आणि त्याच्या नात्याविषयीच्या अस्वस्थतेबद्दल विचारतो. पारू काहीही नाही असे सांगत आपल्या भावना दडपण्याचा निर्धार करते.
पारू आदित्यपासून दूर जाते आणि त्याला "मालक साहेब" म्हणून हाक मारते. जाहिरातीच्या शूट दरम्यान, गाडीचा टायर पंक्चर झाल्याने पारू एकटी आहे. नानू नावाच्या केअरटेकरकडून तिला मदत मिळते, पण यामुळे आदित्य जेलस होतो. दरम्यान, गुरुजींच्या भविष्यवाणीमुळे नाट्य आणखी वाढते, ज्यामुळे अहिल्या, पारू आदित्यच्या भाग्याशी संबंधित आहे का यावर शंका घेऊ लागते. नाट्य त्याच्या शिखरावर पोहोचत जेव्हा अनुष्का निराश होऊन पारूशी नशेत वाद घालते.
पारूचे उत्तर हा संघर्ष आणखी वाढवेल का, की काही नवे खुलासे उघड होतील ? भावनांच्या या नाट्यमय प्रवासाला चुकवू नका 'पारू' दररोज संध्याकाळी ७:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.