Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सनी देओलने 'जाट' सिनेमातून केले दमदार पुनरागमन!

 *सनी देओलने 'जाट' सिनेमातून केले दमदार पुनरागमन! नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये ऍक्शन, थरार आणि स्टंट्सचा धमाका पाहायला मिळणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्कंठा आणखीनच वाढली आहे*


*सनी देओलच्या 'जाट' सिनेमाच्या टीझरमध्ये दिसला वन-मॅन आर्मी लुक; दमदार ऍक्शन आणि एंटरटेनमेंटने परिपूर्ण टीझर पाहून चाहत्यांची वाढली उत्सुकता*


अभिनेता सनी देओलच्या आगामी ऍक्शन सिनेमा "जाट"चा बहुप्रतिक्षित टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे, ज्याने चाहत्यांना अक्षरशः थक्क करून टाकले आहे. या सिनेमाच्या निमित्ताने ऍक्शन सुपरस्टार परत आला आहे असं नक्कीच म्हणावं लागेल.  काही दिवसांपूर्वी ब्लॉकबस्टर "पुष्पा 2" च्या विशेष प्रीमियर दरम्यान "जाट" चा टीझर प्रदर्शित झाला. 12,500 स्क्रीनवर हा टीझर दाखवण्यात आला आणि ही भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठी बाब आहे. 



जेव्हा या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला तेव्हा या प्रेक्षकांची एनर्जी अफलातून होती. सनी देओलच्या दमदार अभिनयाने आणि थरारक ऍक्शन सीन्सला प्रेक्षकांनी जोरदार शिट्ट्या आणि टाळ्यांच्या माध्यमातून त्यांचा उत्साह आणि प्रतिसाद दाखवला. टीझरने चाहत्यांना खुर्चीला खिळवून ठेवले, यावरुन हे पुन्हा सिद्ध झाले की सनी देओल भारतीय सिनेसृष्टीतील खरा ऍक्शन हिरो आहे.


दूरदृष्टी असलेल्या गोपीचंद मालिनेनी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला आणि मायथ्री मूवी मेकर्स व पीपल मीडिया फॅक्टरी या दोन दमदार निर्मात्यांनी निर्मिती केलेला 'जाट' हा सिनेमा ऍक्शन जॉनरला एका नव्या उंचीवर घेऊन जाणार हे नक्की. रणदीप हुड्डा, विनीत कुमार सिंह, सैयामी खेर आणि रेजिना कैसंड्रा यांसारख्या प्रतिभावान कलाकारांच्या जबरदस्त अभिनयासोबतच हा सिनेमा  प्रेक्षकांना एका दमदार आणि रोमांचक कथानकाचा अनुभव देणार आहे.


'जाट' या सिनेमाची संगीताची जबाबदारी थमन एस यांनी घेतली आहे, तर सिनेमॅटोग्राफी ऋषी पंजाबी यांनी सांभाळली आहे. नवीन नूली यांनी एडिटींगचे काम अतिशय चोख केले असून, अविनाश कोला यांनी प्रोडक्शन डिझाइनची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. ऍक्शन सीनसाठी अनल अरासु, राम-लक्ष्मण आणि वेंकट यांच्या टीमने उत्कृष्ट स्टंट आणि रोमांचक ऍक्शन सिक्वेन्स तयार केले आहेत, जे प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतील.


टीझर म्हणजे 'जाट' या सिनेमातील भव्य दृश्यांची केवळ एक झलक आहे. सिनेमाच्या रिलीजसाठी काउंटडाउन सुरू झाल्यामुळे, चाहते आता एप्रिल 2025 मध्ये सिनेमागृहात हा रोमांचक प्रवास अनुभवण्याची प्रतिक्षा नक्कीच करत असतील, असा विश्वास वाटतो.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.