Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*वसुंधरा की कुंटुंब, जयश्रीचं आकाशला अल्टिमेटम !*

*वसुंधरा की कुंटुंब, जयश्रीचं आकाशला अल्टिमेटम !*


'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत आकाशवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचतात, ज्यांना विशाखाने बोलावलंय. विशाखा आकाशच्या घरच्यांना सुचवते की आकाश बरा होईपर्यंत ठाकुरांचा व्यवसाय अखिलने संभाळावा.  डॉक्टर सांगतात की आकाशची अवस्था खूप वाईट आहे. वसू आकाशच्या लवकर बरं होण्यासाठी पूजा करतेय ज्यामध्ये बनी आणि चिनूही सामील होतात. आकाश बरा होताच जयश्री वसूकडून तिचं मंगळसूत्र मागते, वसुंधराने नकार देताच जयश्रीला राग अनावर होऊन ती वसूला घराबाहेर काढणार आहे. त्याचवेळेस आकाश सगळ्यांसमोर वसूला आपली पत्नी म्हणून मान्य करतो, ज्यामुळे सर्वजण हादरून जातात. वसू आकाशसमोर सत्य लपवल्याबद्दल माफी मागते, ज्यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण होतो. कुटुंब वसूपासून दूर राहतं, पण आकाश तिच्या समर्थनार्थ उभा आहे. जयश्री आकाशला अल्टिमेटम देते- वसू किंवा कुटुंब यापैकी काहीतरी एक निवड. याच दरम्यान कुटुंबाच्या व्यवसायात अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यातच भास्कर आणि माधव आपली नोकरी सोडतात. 



वसू आणि आकाश एकमेकांना आधार देत, जवळ येऊ लागलेत. लकी, वसूचा कायदेशीर पती आणि बनीचा बाप असल्याचा फायदा घेतो, तर विशाखा संपत्तीच्या वाटणीचा आग्रह धरते आणि अखिलसाठी वेगळा व्यवसाय सुरू करायचा विचार करते. लकीही पैसे मिळाल्यास बनीला घेऊन दूर जाण्याची तयारी दाखवतो आणि आकाशआणि वसूला धमकी देतो की कुटुंबाचं रक्षण करायचं असेल तर वसूला  त्याच्यासोबत रहावे लागेल. 

 

*आता आकाश, वसूची  घटस्फोटाची मागणी पूर्ण करेल का ? लकी त्याच्या प्लॅन मध्ये यशस्वी होईल? आकाश, जयश्रीच्या विरोधात जाईल ? हे जाणून घेण्यासाठी बघत राहा 'पुन्हा  कर्तव्य आहे' दररोज रात्री ९:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.