Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्ल ठरलेला धर्मवीर २ मधे अभिनेता

 बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्ल ठरलेला धर्मवीर २ मधे अभिनेता 

ते दिग्दर्शकाच्या खुर्चीत पुन्हा एकदा बसणारा प्रसाद ओक ! 

२०२४ वर्षाला निरोप देताना काही कलाकार अजून देखील दमदार काम करताना दिसतायत आणि यातला एक कलाकार म्हणजे अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता प्रसाद ओक ! 

प्रसाद ओक याने २०२४ वर्ष गाजवलं ते म्हणजे धर्मवीर २ या चित्रपटाने ! आदरणीय धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका त्याने साकारली आणि या भूमिकेला प्रेक्षकांनी पुन्हा एकदा भरभरून प्रेम दिलं. जगभरातून या भूमिकेला उदंड प्रतिसाद मिळाला आणि प्रसाद ने साकारलेली भूमिका दमदार ठरली. प्रसाद कायमच वेगवेगळ्या विषय असलेल्या चित्रपटात भूमिका करताना दिसतो आणि अशीच एक भूमिका असलेला हा चित्रपट होता. 


येणाऱ्या वर्षात प्रसाद अभिनेता म्हणून वेगवेगळ्या चित्रपटात दिसणार आहेच पण तो एका धमाल चित्रपटाचं दिग्दर्शन करताना ही दिसणार आहे. 

"सुशीला - सुजीत" ची कथा देखील प्रसाद ओक नेच लिहिली आहे. दिग्दर्शक आणि कथा लेखन अशी दुहेरी भूमिका 

सुशीला - सुजीत मध्ये प्रसाद साकारताना दिसणार आहे. 

हा चित्रपट १८ एप्रिल २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 



प्रसाद 2024 बद्दल सांगताना म्हणतो "वेगळ्या विषयांवरचे आणि चांगले चित्रपट आले की प्रेक्षक त्याला उत्तम प्रतिसाद देतातच. गेल्या २/३ वर्षात आलेले धर्मवीर, चंद्रमुखी, बाईपण भारी देवा, झिम्मा, धर्मवीर २, सरसेनापती हंबीरराव, वाळवी, वेड, नाच गं घुमा, नवरा माझा नवसाचा २, फुलवंती, ये रे ये रे पैसा, पावनखिंड अशा अनेक चित्रपटांनी हे सिद्ध केलं. सरतं वर्ष उत्तम गेल. येणार वर्षही उत्तमच जाणार…

मराठी प्रेक्षक चांगले सिनेमे 

नक्की उचलून धरणार. 

" जिलबी " या सस्पेन्स थ्रिलर ने करणार असून यात तो एका उद्योगपतीची भूमिका करताना दिसतोय ! १७ जानेवारी २०२५ ला जिलबी प्रदर्शित होणार असून प्रसाद एका वेगळ्याच भूमिकेत यात दिसणार आहे.


२०२५ हे वर्ष प्रसाद साठी चित्रपटमय ठरणार यात शंका नाही ! जिलबी, गुलकंद, वडा पाव, मीरा, आणि महापरिनिर्वाण या चित्रपटांमधून अभिनय, तर सुशीला सुजीत, पठ्ठे बापूराव, भद्रकाली, आणि निळू फुले यांच्यावरचा चरित्रपट अशा विविध चित्रपटांचं दिग्दर्शन शुद्ध प्रसाद येणाऱ्या वर्षात करणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.