Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

झी मराठी वाहिनीच्या कलाकारांसोबत ख्रिसमसच्या आठवणी !

 झी मराठी वाहिनीच्या कलाकारांसोबत ख्रिसमसच्या आठवणी !



ख्रिसमसला प्रथा असते कि स्टोकिंग्स मध्ये आपल्या इच्छा लिहून रात्री दरवाज्या बाहेर किंवा ख्रिसमस ट्री खाली ठेवल्या की त्या इच्छा पूर्ण होतात. लहानपणी, शाळेत असताना खूप वेळा इच्छा पत्र लिहले असावे सर्वांनी. आज आम्ही कलाकारांना त्यांच्या लहानपणात घेऊन गेलो आणि त्यांना विचारले कि जर या वर्षी तुम्हाला सांताक्लॉजला पत्र लिहायचे असेल तर त्यात काय लिहाल. 



प्राप्ती रेडकर म्हणाली," मी माझ्या आई-बाबांना आनंदात आणि सुखात ठेव. त्यांना माझा अभिमान वाटेल मला असे काम करत राहायचे आहे. त्यासोबत जर मला छान काही गिफ्ट मिळाले, सरप्राईज मध्ये तर तेही आवडेल. मी कॉन्व्हेंट शाळेत शिकली आहे, तिथे ख्रिसमस खूप जोरात साजरा केला जातो. सुंदर सजावट केली जाते कारण शाळेतच चर्च ही आहे. शाळेत एक परफॉर्मेंस ही असायचा ज्यात या सणाचे महत्व आणि तो का साजरा केला जातो हे दर्शवले जायचे. मला त्यात नेहमी एंजेल किंवा मदर मेरीची भूमिका मिळायची, आम्ही कॅरल ही गायचो. सांताक्लॉज कडून पाहिलं मिळालेलं गिफ्ट म्हणजे इलेक्ट्रिक स्कीपपिंग रोप , १ - २ री ला असें मी तेव्हा. मला लोक म्हणायचे तुझ्या आई -बाबांनी गिफ्ट ठेवले असेल ते, पण मला आजही विश्वास आहे कि सांताक्लॉज असतात काही लोक याला बालिश ही म्हणतील. मला ख्रिसमसच वातावरण खूप आवडत, हलकी थंडी, सर्वत्र सुंदर लाइटिंग छान माहोल असतो."



तितिक्षा तावडेने सांगितले ," मी माझ्या ख्रिसमसच्या विशलिस्ट मध्ये माझ्या घरच्यांना आणि नवऱ्याला द्यायला भरपूर वेळ मागेन. माझं शेड्युल अत्यंत बिझी चालू आहे. मी सांताक्लॉज कडून चांगल्या ठिकाणी एक छान आणि मोठा हॉलिडे मागेन. लहानपणीची ख्रिसमसची आठवण सांगावीशी वाटतेय, आमचे शेजारी ख्रिश्चन होते त्यांच्याकडे दर वर्षी ख्रिसमस पार्टी असायची, आणि त्यासाठी आम्ही खूप उत्साहित असायचो. २४ डिसेंबरला रात्री आम्ही सर्व मैत्रिणी एकत्र त्यांच्याकडे जायचो. मस्त मेजवानी असायची तिथे प्लम केक, इतर गोवन पदार्थ आणि तिथे छान देखावा बनवलेला असायचा तो बघायला ही मज्जा यायची, मग त्यांच्या प्रार्थना व्हायच्या, त्यानंतर गप्पा-गोष्टी, नाच आणि खेळ खेळायचो. खूप गोड आठवणी आहेत ख्रिसमसच्या."



वल्लरी विराज म्हणाली," मी शाळेत असताना सांताक्लॉजला पत्र लिहायची. माझी ख्रिसमस विश ठरलेली असायची मला एक पेट हवं घरी, मग ते मांजर, कुत्रा कोणीही असू दे. आई नेहमी म्हणायची घरी पेट नको, कारण त्यांची काळजी घायला कोण नव्हतं. पण इतक्या वर्षच्या माझ्या इच्छेला, आईनेच पूर्ण केले. ९ वीत असताना माझ्या आईने माझ्यासाठी पर्शिअन मांजर आणली. ह्यावर्षी जर सांताक्लॉजला पत्र लिहायचे झाले तर मी लिहीन माझी मालिका 'नवरी मिळे हिटलरला' प्रेक्षकांना आवडतेच आहे पण आणखी खूप जास्त पसंतीस उतरू दे.  दुसरी विष कि माझ्या आई -बाबांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे."



शरयू सोनावणे म्हणते," मी सांताक्लॉजच्या विशलिस्ट मध्ये लिहीन, जसं मी आता काम करतेय तसंच आयुष्यात पुढेही वेगवेगळं काम करण्याची संधी मिळत राहू दे. मला सदैव छान काम करण्याची हिम्मत आणि ताकात ही मिळू दे. लहानपणापासून मला सांताक्लॉज कडून गिफ्ट मिळत, मला माहिती नव्हतं कि सांताक्लॉज कोण आहे. मला असा वाटायचे कि खरंच सांताक्लॉज येतो आणि गिफ्ट देतो, काही वर्षांनी मला कळलं माझी आईच माझा सांताक्लॉज आहे. माझी आई मला विचारायची कि तुला काय गिफ्ट हवं आणि मला नेहमी माझ्या मनासारख्या गोष्टी मिळायच्या. लग्नाच्या आधी माझी आई, माझा सांताक्लॉज होती. आता लग्न झाल्यानंतर  माझा नवरा ही प्रथा पुढे नेतोय. माझी आई आणि नवरा हे दोघं माझ्या आयुष्यातले सांताक्लॉज आहेत."


पूर्वा  कौशिक म्हणाली, " पहिले तर सर्वाना ख्रिसमसच्या शुभेच्छा. ख्रिसमस भलेही आपल्यात साजरा केला जात नाही पण मला ख्रिसमस ही तितकाच आवडतो, कारण माझे काही ख्रिश्चन मित्र-मैत्रिणी आहेत. अंबरनाथला राहत असताना ते नेहमी ख्रिसमसला मला केक आणून द्यायचे हे त्यांचं ठरलेलं असायचं.  लहानपाणीची आठवण अशी आहे कि सांताक्लॉज येतो आणि मोज्या मध्ये चोकोलेट्स ठेवून जातो. मला हे संकल्पना खूप गोड वाटते. आता जर मला काही मागायचे झाले तर इतकंच मागेन आतापर्यंत जे दिले आहेस  त्यासाठी मनापासून आभार. मला अनुभवातून खूप काही शिकायला मिळावे आणि  माझ्या मेहनतीच्या प्रवासात सर्व माझ्यासोबत असावे इतकीच इच्छा आहे."


दिशा परदेशी म्हणाली," ख्रिसमसच्या खूप आठवणी आहेत कारण २५ डिसेंबरला माझ्या आई- बाबांच्या लग्नाचा वाढदिवस असतो. नाताळ हा आपला सण नाही, पण आम्ही जसं गणपती, दिवाळी, होळी साजरी करतो तितक्याच उत्साहाने ख्रिसमस ही साजरा केला जातो. कारण आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवस असतो. आम्ही ख्रिसमस ट्री सजवतो, घरी पूर्ण परिवार एकत्र येतो आम्ही सर्व भावंडं खूप मज्जा करतो. अजून एक खास गोष्ट २५ डिसेंबरची म्हणजे माझ्या घरी एक शीतझू डॉग आहे तिचा ही जन्म २५ डिसेंबरचा. लहानपणी माझे बाबा माझे सांताक्लॉज होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.