Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*'इंद्रायणी', 'आई तुळजाभवानी' ते 'अशोक मा.मा.'; 'कलर्स मराठी'वरील मालिकांचा 23 डिसेंबरला रंगणार विशेष भाग*

 *'इंद्रायणी', 'आई तुळजाभवानी' ते 'अशोक मा.मा.'; 'कलर्स मराठी'वरील मालिकांचा 23 डिसेंबरला रंगणार विशेष भाग*


*पहा, संध्याकाळी 7 वाजल्यापासून फक्त आपल्या 'कलर्स मराठी'वर*



दररोज न चुकता प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या 'कलर्स मराठी'वरील मालिकांचा 23 डिसेंबरपासून विशेष भाग पार पडणार आहे. यात 'इंद्रायणी','पिंगा गं पोरी पिंगा', 'अशोक मा.मा.', '#लय आवडतेस तू मला', 'आई तुळजाभवानी' आणि 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकांचा समावेश आहे.'इंद्रायणी' या मालिकेत आनंदी इंदूच्या कीर्तनाद्वारे पैसे कमावताना दिसून येईल. तर दुसरीकडे 'पिंगा गं पोरी पिंगा' या मालिकेत एक वेगळाच धमाका झालेला पाहायला मिळेल. 'अशोक मा.मा.' या मालिकेत भैरवी आणि अशोक मा.मा. समोरासमोर येणार आहेत. '#लय आवडतेस तू मला' या मालिकेत सरकार सानिकाला वाचवताना दिसून येईल. 'आई तुळजाभवानी'मध्ये शिव कन्या अशोकसुंदरीचं भूतलावर आगमन होणार आहे. 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत स्वामी लीलेची अलौकिक प्रचिती होणार आहे.  



'इंद्रायणी' या मालिकेत आनंदीबाईंनी नुकतीच इंदूची माफी मागितली असून आता दुसरं कटकारस्थान रचायला त्या सज्ज आहेत. इंदूच्या कीर्तनाच्या माध्यमातून आनंदीबाईंचा पैसे कमावण्याचा हेतू आहे. 'पिंगा गं पोरी पिंगा' या मालिकेत वल्लरीने गुपित लपवल्याने मनोजचा राग अनावर होतो. श्वेताला मात्र त्याचं हे वागणं खटकतं आणि ती मनोजच्या कानशि‍लात लगावते. आपल्या पतीचा अपमान झाल्याचं वल्लरीला सहन होत नाही आणि ती श्वेताच्याच कानशिलात लगावते. हा सगळाच धमाका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार आहे.



'अशोक मा.मा.' या मालिकेत एक वेगळाच ट्विस्ट आला आहे. अशोक मा.मा. आणि भैरवी आमने-सामने आले असून मुलांसाठी त्यांच्यात एक वेगळाच लढा सुरू होणार आहे. मुलांच्या कस्टडीसाठी भैरवी न्यायाची पायरी चढायला तयार आहे तर अशोक मा.मा. देवासोबत भांडायलाही तयार आहेत. '#लय आवडतेस तू मला' या मालिकेत सानिका गॅस सुरू असलेल्या एका बंद रूमध्ये बेशुद्ध पडते. सरकार घराबाहेर असतानाही त्याला ही गडबड जाणवते आणि बॉडीगार्डचा हक्क बजावत तो येऊन तिला वाचवताना दिसेल. 



'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत प्रेक्षकांना अनेक स्वामी लीला पाहायला मिळत आहेत.अशातच आता या मालिकेत स्वामी लीलेची लोकप्रिय अशी अलौकिक प्रचिती  पाहायला मिळेल. एका दगडात परब्रम्ह असू शकत नाही, अशी धारणा असणाऱ्या गणेश सोहोनी यांना एका दांपत्याचे मन राखण्यासाठी पाषाण पादुकांची पूजा करावी लागते.ही पूजा सुरू असताना त्याचं नकळत नख पाषाण पादुकांना लागतं आणि या दगडी पादुकांमधून रक्तस्त्राव होऊ लागतो. या अलौकिक घटनेनंतर त्यांच्या नास्तिक विचारसरणीला धक्का बसतो आणि स्वामींचे पादुकांमधले अस्तित्व जाणवून ते कृतकृत्य होतात.या घटनेने त्याच्या आयुष्यात घडणारा बद्दल स्वामी चरित्रातला महत्वाचा टप्पा आहे.


'आई तुळजाभवानी' या मालिकेत शिव कन्या अशोकसुंदरी देवीच्या भेटीला येणार आहे. पार्वतीचा एकटेपणा दूर करण्यासाठी महादेवांनी ही दैवी रचना रचली आहे.


आपल्या लाडक्या 'कलर्स मराठी'वरील मालिकांचे हे विशेष भाग 23 डिसेंबरला नक्की पाहा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.