Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चित्रपट ते नाटक 2024 वर्ष अभिनेता शुभंकर तावडे साठी या कारणाने ठरलं खास !

 चित्रपट ते नाटक 2024 वर्ष अभिनेता शुभंकर तावडे साठी या कारणाने ठरलं खास ! 


वेगवेगळ्या माध्यमातून कायम प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा तरुण अभिनेता म्हणजे शुभंकर तावडे ! 2024 वर्षात शुभंकरने अनेक गोष्टी केल्या आणि हे वर्ष त्याचासाठी लक्षवेधी ठरल. वर्षाची सुरुवात शुभंकर ने चित्रपटाने केली तर वर्षाचा शेवट त्याने नाटकाने केला. 


2024 मध्ये शुभंकर ने वैविध्यपूर्ण आणि लक्षवेधी भूमिका साकारल्या पण त्याचा फॅशन गेम मुळे सुद्धा तो चर्चेत राहिला. चित्रपटाचे ट्रेलर लाँच असो किंवा कामाचा भाग म्हणून केलेलं फोटोशूट असो शुभंकरने या वर्षात फॅशन मध्ये देखील तितकेच प्रयोग केले. 



कायम वेगळ्या धाटणीच्या भूमिका असलेले चित्रपट करणारा शुभंकर  लाईक आनी सबस्क्राईब, कन्नी आणि 8 दोन 75 या चित्रपटाचा महत्त्वपूर्ण भाग झाला. तिन्ही चित्रपट वेगवेगळ्या विषयांवर असले तरी शुभंकरची प्रत्येक भूमिका तेवढीच लक्षवेधी ठरली.


कलाकार म्हणून त्याने वर्षभर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि वैयक्तिक आयुष्यात देखील एक लाख मोलाचा पल्ला गाठणारी गोष्ट त्याने या वर्षात केली. शुभंकरने वाढदिवसाच्या दिवशी नवी कार घेतली आणि तिचं नाव देखील तितकच खास ठेवलं ! लक्ष्मी असं या नव्या गाडीच नाव असून या मागची खास गोष्ट त्याने सोशल मीडिया वर लिहिली होती. 


2024 बद्दल बोलताना शुभंकर सांगतो "हे वर्ष माझ्यासाठी खरंच खूप भावनिक ठरलं अनेक चढ उतार सोबतीला घेऊन या वर्षाला निरोप देतोय. या सगळ्या चढ उतारात घरचे, मित्र मंडळी अगदी हक्काने माझ्या पाठीमागे उभे होते. 2024 वर्षाला निरोप देताना सगळ्यांना मनापासून थैंक्स बोलावंसं वाटतं येणार वर खूप हेल्दी, स्ट्रोंग आणि भरपूर काम घेऊन येऊ दे ही आशा करतो "


वर्ष संपताना शुभंकरने त्याचा आवडत्या कलाकार मंडळी सोबत "विषामृत" नावाचं नाटक देखील केलं. तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करणार हे नाटक सध्या रंगभूमीवर प्रेक्षकांचं प्रेम मिळवत आहे. तरुणांचे प्रश्न, नातेसंबंधांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन, तरुणांचं भावविश्व या नाटकांमधून उलगडतंय. शुभंकरने या नाटकात मुख्य भूमिका साकारली असून पुन्हा एकदा शुभंकर ने तरुणाईला त्याचा प्रेमात पडायला भाग लावलं आहे. 


आता आगामी नवीन वर्षात शुभंकर अजून काय काय नव्या प्रोजेक्टचा भाग होणार आहे हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.