निर्मिती विश्वातल पदार्पण ते नव्या कोऱ्या गाडीच्या चर्चा अभिनेता- निर्माता स्वप्नील जोशी साठी 2024 या गोष्टी साठी ठरलं खास !
वर्ष संपताना मागे वळून पाहिलं तर निर्माता- अभिनेता स्वप्नील जोशीच्या कामाचा आलेख हा वाढत जाणारा आहे. 2024 वर्षाची सुरुवात त्याने निर्मिती विश्वात पदार्पण करण्यापासून केली आणि बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्ल चित्रपटाची निर्मिती केली.
2024 वर्षात स्वप्नील जोशीची निर्मिती असलेला चित्रपट "नाच गं घुमा" बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि पुढे हा सिलसिला असाच सुरू राहिला ! दुहेरी भूमिका बजावताना अनेक आव्हानं देखील आली पण अभिनय आणि निर्मिती यांची योग्य सांगड घालत स्वप्नील ने हे वर्ष गाजवल.
नाच गं घुमा, बाई गं , नवरा माझा नवसाचा 2 अश्या धमाकेदार चित्रपटातून त्याने प्रेक्षकांना आपलंसं केलं आणि त्याचा वाळवी चित्रपटाने नॅशनल अवॉर्ड सुद्धा पटकावला. काम जे जोरदार झालं पाहिजे असं स्वप्नील नेहमीच म्हणतो आणि म्हणून 2024 वर्ष हे त्याने खऱ्या अर्थाने सुपरहिट केलं आहे.
स्वप्नील ने वर्ष संपत असताना अजून एका निर्मिती ची घोषणा केली आणि चाहत्यांना डबल सरप्राईज दिलं ! सुशीला - सुजीत या आगामी चित्रपटात तो निर्माता आणि अभिनेता या दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकतीच सुशीला - सुजीत चित्रपटाची रिलीज झाली असून १८ एप्रिल २०२५ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
वर्ष संपतय पण स्वप्नीलच्या नव्या प्रोजेक्ट्स ची एका मागोमाग एक यादी मोठी आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही कारण त्याने वर्ष सरताना पहिल्या वहिल्या गुजराती चित्रपटाची घोषणा केली आहे. " शुभचिंतक " अस या गुजराती चित्रपटाचं नाव असून येणाऱ्या वर्षात स्वप्नील गुजराती प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
आगामी वर्षात स्वप्नील 17 जानेवारीला जिलबी तर 18 एप्रिलला सुशीला - सुजीत हे दोन नवेकोरे चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्या वर्षात स्वप्नील अजून कोणकोणत्या प्रोजेक्ट्सचा भाग होणार हे बघण आता उत्सुकतेच ठरणार आहे.