Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ताहिर राज भसीनचा जागतिक हिट शो : 'ये काली काली आंखें 2' 10 देशांत गाजतोय

 ताहिर राज भसीनचा जागतिक हिट शो : 'ये काली काली आंखें 2' 10 देशांत गाजतोय


गेल्या शुक्रवारी नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला 'ये काली काली आंखें' सीझन 2 गुन्हा, प्रेम, वेड आणि हत्येच्या जबरदस्त मिश्रणाने प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. सध्या हा शो भारत, बहरेन, मालदीव, मॉरिशस, यूएई, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, कतर आणि ओमान अशा 10 देशांत ट्रेंडमध्ये आहे, जे याच्या जागतिक लोकप्रियतेचे आणि कथानकाच्या तीव्रतेचे द्योतक आहे.



या शोच्या केंद्रस्थानी ताहिर राज भसीन याचा दमदार अभिनय आहे, जो एका अशा व्यक्तीची भूमिका साकारतो, जो सतत धोके आणि असहायतेचा चक्रात अडकलेला असतो. त्याच पात्र एक सामान्य व्यक्तीच्या आतून बदल होत जाण्याचा त्रासदायक प्रवास दाखवतो, जो बाहेरील धोके आणि अंतर्गत संघर्षामुळे ग्रस्त आहे. जसजसे प्रसंग गंभीर होतात आणि प्रेम व वेडामध्ये सीमारेषा अस्पष्ट होतात, तसतसे प्रेक्षकांना थरारक, भावनांनी भरलेला आणि अनपेक्षित वळणांचा प्रवास अनुभवायला मिळतो.


ताहिर म्हणतो, "पहिल्या सीझनच्या प्रचंड यशानंतर, ज्याने जागतिक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले, दुसऱ्या सीझनला 10 देशांमध्ये अधिक प्रेम आणि कौतुक मिळणे हे माझ्यासाठी कलाकार म्हणून अत्यंत सन्मानजनक आहे. दुसरा सीझन बनवताना, पहिल्या यशाच्या अपेक्षांना सामोरे जाण्याचा ताण असतो, पण आम्हाला आनंद आहे की आम्ही सीझन 2 च्या 'कर्स' ला तोडले आणि आमच्या चाहत्यांचे उत्तम मनोरंजन केले. या सिक्वेलसाठी मिळालेला प्रचंड प्रतिसाद खूप उत्साहवर्धक आहे."


तो पुढे म्हणाला,

"माझ्या सहकलाकारांचे आणि संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार, ज्यांच्या मेहनतीमुळे हा प्रवास अविस्मरणीय झाला. हा अनुभव माझ्यासाठी अत्यंत समृद्ध करणारा होता, आणि भविष्यात आणखी दमदार कथा सादर करण्याची संधी मिळण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे."


सीझन 2 पात्रांच्या गुंतागुंतींना आणखी खोलवर नेतो. ताहिरचा अभिनय भीती, अस्तित्वासाठी संघर्ष, आणि भ्रष्टाचार व फसवणुकीने भरलेल्या जगात घेतलेल्या निर्णयांचे परिणाम या सर्वांचा प्रभावी प्रवास दर्शवतो. या शोची गडद थीम इतक्या तीव्रतेने मांडण्याची क्षमता याला क्राइम थ्रिलर श्रेणीत वेगळं स्थान मिळवून देते आणि प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.