प्राइम व्हिडिओतर्फे प्रसिद्ध क्राइम थ्रिलर पाताल लोकच्या बहुप्रतीक्षित दुसऱ्या सीझनच्या प्रीमियरची तारीख जाहीर, जानेवारी 17, 2025 पासून स्ट्रीम होणार
क्लीन स्लेट फिल्म्झ प्रॉडक्शन आणि युनोया फिल्म्स एलएलपी यांची निर्मिती आणि सुदीप शर्मा यांची कार्यकारी निर्मिती असलेली ही आठ एपिसोड्सची सीरीज लवकरच प्रदर्शित होणार
अविनाश अरूण धावरे यांचे दिग्दर्शन असलेल्या पाताल लोक सीझन २ मध्ये जयदीप अहलावत, इश्वाक सिंग, तिलोत्तमा शोम आणि गुल पनाग अशी दमदार स्टारकास्ट
भारत व २४० देशांतील प्राइम सदस्यांना ही नियो-नोयर पद्धतीचे चित्रण असलेली गुन्हेगारी विश्वावर आधारित सीरीज प्राइम व्हिडिओवर जानेवारी 17, 2025 पासून पाहाता येणार
Asset Link: https://www.instagram.
मुंबई, भारत, 23 डिसेंबर – प्राइम व्हिडिओ या भारतातील सर्वाधिक पसंतीच्या मनोरंजक प्लॅटफॉर्मने त्यांच्या बहुप्रतीक्षीत आणि समीक्षकांनी गौरवलेल्या पाताल लोक सीरीजच्या दुसऱ्या सीझनच्या प्रीमियरची तारीख जाहीर केली. भारतीय समाजाच्या अंतरंगावर आधारित या लोकप्रिय फ्रँचाईझीने पहिल्या सीझनमध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. अविनाश अरूण धावरे यांनी दिग्दर्शित केलेली ही सीरीज क्लीन स्लेट फिल्म्झ प्रॉडक्शन आणि युनोया फिल्म्स एलएलपी यांची निर्मिती आहे. या सीरीजची कार्यकारी निर्मिती सुदीप शर्मा यांनी केली आहे. या सीरीजमध्ये जयदीप अहलावत, इश्वाक सिंग, गुल पनाग या दमदार स्टारकास्टबरोबरच तिलोत्तमा शोम, नागेश कुकनूर आणि जानू बरूआ यांसारखे नवे कलाकारही यावेळी दिसणार आहेत. गुन्हेगारी विश्वावर आधारित सीरीज प्राइम व्हिडिओ आणि २४० देशांत जानेवारी 17, 2025 पासून पाहाता येणार आहे.
या फ्रँचाईझीच्या पहिल्या सीझनचे समृद्ध कथा, अनपेक्षित वळणे आणि थरार यासाठी कौतुक झाले होते. सगळ्याची परिणीती विचार करायला लावणाऱ्या क्लायमॅक्समध्ये झाल्यामुळे प्रेक्षक न्याय व भ्रष्टाचारामध्ये असलेल्या पुसट सीमारेषेवर खिळून राहिले. नव्या सीझनमधलं नाट्य नव्या पातळीवर नेण्यात आलं असून प्रेक्षकांना जास्त गडद आणि धोकेबाज विश्व अनुभवायला मिळणार आहे. नव्या सीझनमध्ये यातील प्रसिद्ध व्यक्तीरेखा ‘हाथी राम चौधरी’ आणि त्याची टीम अज्ञात- संकटमय प्रदेशात प्रवेश करणार असून त्यांना कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागणार आहे.
पाताल लोक सीरीजने दमदार सादरीकरण, गुंतागुंतीच्या व्यक्तीरेखा आणि समाजातील वास्तवाचे चित्रण दाखवत समीक्षकांची प्रशंसा तसेच मोठा चाहतावर्ग मिळवला, असे प्राइम व्हिडिओ इंडियाच्या ओरिजनल्स विभागाचे प्रमुख निखिल मधोक म्हणाले. ‘प्राइम व्हिडिओमध्ये आम्ही कायमच आमच्या सीरीजच्या दोन महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करतो – ते म्हणजे, आम्ही ज्या कथा सादर करतो, त्या अनोख्या व लक्षवेधी असायल्या हव्यात आणि त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची योग्य वेळ ओळखता आली पाहिजे. या निओ- नुआं पद्धतीने चित्रित करण्यात आलेल्या सीरीजच्या पहिल्या सीझनने आम्हाला दुसऱ्या भागात आणखी खोलवर जाण्याची प्रेरणा दिली. सुदीप, अविनाश आणि गुणवत्तापूर्ण स्टारकास्टबरोबर परत काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. या नव्या सीझनबद्दल आम्ही उत्सुक असून त्यात आम्ही सर्जनशीलतेच्या नव्या मर्यादा पार केल्या आहेत.’