बालदिनाच्या निमित्ताने, ‘सावली होईन सुखाची’ या सन मराठीवरील मालिकेतील बालकलाकार आरंभी सांगते आहे सेटवरील मज्जा आणि अभिनयाबद्दल
बालदिन हा छोट्या बालकांच्या आनंद, निरागसता आणि स्वप्नांचा दिवस आहे. या खास दिवशी आरंभी, जी ‘सावली होईन सुखाची’ मालिकेत मुख्य बालकलाकाराची भुमिका साकारते, तिच्या आठवणी, आणि या प्रवासाबद्दल सांगते.
बालदिनाविषयी सांगताना आरंभी म्हणाली, "बालदिन म्हणजे आनंद साजरा करण्याचा दिवस! मला खेळायला, हसायला, आणि खूप गोष्टी शिकायला आवडतात. प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकण्याचा असतो, आणि माझ्या आजूबाजूचे सर्व लोक माझं हसणं आणि मस्ती बघून खूप आनंदी होतात. ‘सावली होईन सुखाची’ मालिकेत काम करताना मला कधीच मोठं झाल्यासारखं वाटत नाही, उलट मला नवीन गोष्टी शिकायची आणि खूप मज्जा करण्याची संधी मिळते. असंच मला पुढेही काम करता यावं, हिच माझी इच्छा आहे!"
आरंभीची शिकण्याची आणि बागडण्याची आवड आपल्याला बालपणाची गोडी अनुभवायला लावते. अभिनय आणि शिक्षणातील तिची आवड प्रेरणादायक आहे. ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेत आरंभीचा जादूई अभिनय पाहण्यासाठी सोमवार ते शुक्रवार रात्री ९:०० वाजता फक्त सन मराठीवर!