Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

९ आणि १० ऑक्टोबरला रंगणार मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३ चा महाअंतिम सोहळा

 ९ आणि १० ऑक्टोबरला रंगणार मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३ चा महाअंतिम सोहळा

महाराष्ट्राचे लाडके गायक अभिजीत सावंतरोहित राऊतजुईली जोगळेकर आणि राधा खुडे छोट्या उस्तादांना देणार साथ 

 

स्टार प्रवाहवरील मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या तिसऱ्या पर्वाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. छोट्या उस्तादांनी आपल्या भारावून टाकणाऱ्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या छोट्या उस्तादांमधून  सर्वोत्तम स्पर्धकांनी आता गाठली आहे महाअंतिम फेरी. अप्रतिम गाणी सादर करुन प्रेक्षकांची मन जिंकलेल्या मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३ कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा ९ आणि १० नोव्हेंबरला पाहायला मिळणार आहे.



पुण्याचा देवांश भाटे आणि स्वरा किंबहुनेअहमदनगरचा सारंग भालकेयवतमाळची गीत बागडे आणि विरारच्या पलाक्षी दीक्षित आणि जुई चव्हाण या सहा जणांमध्ये महाअंतिम लढत रंगणार आहे. त्यामुळे सुपरस्टार होण्याचा मान कोण पटकवणार याची उत्सुकता वाढली आहे. छोट्या उस्तादांना या पर्वात मोलाचं मार्गदर्शन केलं ते सुप्रसिद्ध अभिनेतेनिर्माते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकरलोकप्रिय़ गायिका वैशाली सामंततरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा गायक आदर्श शिंदे आणि सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अविनाश-विश्वजीत यांनी. या संगीत महारथींच्या सानिध्यात छोट्या उस्तादांवर गाण्याचे संस्कार झालेत त्यामुळे त्यांची पुढील वाटचाल दैदीप्यमान असणार यात शंका नाही.


महाअंतिम सोहळ्यात छोटया उस्तादांना साथ देण्यासाठी अभिजीत सावंतरोहित राऊतजुईली जोगळेकरराधा खुडे खास हजेरी लावणार आहेत. सिद्धार्थ जाधव देखिल या महाअंतिम सोहळ्यात धिंगाणा घालणार आहे. टॉप ६ स्पर्धकांमध्ये सुरांची महाजुगलबंदी देखिल रंगणार आहे. यासोबतच स्टार प्रवाहच्या परिवाराच्या उपस्थितीत सोहळ्याची रंगत द्विगुणीत होणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३ चा महाअंतिम सोहळा येत्या ९ आणि १० नोव्हेंबरला रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.