*"मुलींना कसं कपाट, कपड्याने भरलेलं बघायला आवडतं तसंच मला..." - पूर्वा कौशिक*
*"मी लवंगी फटाक्यासारखी आहे" - पूर्वा कौशिक*
जिथे जाईल तिथे आपल्या धमाकेदार व्यक्तिरेखेने सर्वांचं मन जिंकणारी 'शिवा' म्हणजेच *पूर्वा कौशिक* ने असा किस्सा सांगितलं जो ऐकून तुम्ही हैराण व्हाल. "पहिलं तर सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा. मला लक्षात आहे कि मी लहान होते आणि मला खुपसारे फटाके पाहिजे होते. म्हणजे मुलींना कसं कपाट, कपड्याने भरलेलं बघायला आवडतं तसच मला तेव्हा खूप फटाके हवे होते म्हणजे जर ५ दिवस दिवाळी आहे तर १० दिवस वापरता येतील इतके फटाके मला हवे होते. त्यासाठी मी बाबांकडे इतका हट्ट केला. मी तेव्हा ७ वीत होते. *दिवाळीची सुट्टी पडायच्या आधी शेवटचा दिवस होता शाळेत आणि अचानक मला माहिती नाही काय सुचलं* कि आपण फटाक्यांसाठी अती हट्ट केलायं बाबांजवळ आणि बाबांनी ही मला समजावलं कि इतके फटाके नाही फोडायचे लोकांना आणि प्राण्यांना त्रास होतो आणि त्यानंतर मी कधीच फटाके वाजवले नाहीत. ही आठवण माझ्या स्मरणात आहे. मला वाटत मी लवंगी फटाक्यासारखी आहे. कारण मी छोट्या-छोट्या कारणांवरून फुटते. माझी जर फराळाशी तुलना करायची असेल तर मला चिवडा आवडतो आणि जसे चिवड्यात शेंगदाणे, खोबरं, पोहे, शेव या सर्वगोष्टी एकमिश्र असतात मी ही तशीच आहे. मी सर्वाना सांभाळून घेते असं मला वाटतं."
तुमच्या प्रेमाचा वर्षाव 'शिवा' मालिकेवर असाच करत राहा आणि दररोज रात्री ९:०० वा. बघायला विसरू नका 'शिवा' फक्त आपल्या झी मराठीवर.