*"एक्टर म्हणून एक्शन करायचं माझं नेहमीचं स्वप्न होतं!" – 'अल्फा'मधून शर्वरीची स्वप्नपूर्ती*
बॉलिवूडची उभरती स्टार शर्वरीने खुलासा केला आहे की एक्शन हा तिचा आवडता जॉनर आहे! सध्या ती वायआरएफ स्पाय युनिव्हर्सच्या आगामी अल्फा या एक्शन चित्रपटात सुपरस्टार आलिया भट्टसोबत काम करत आहे आणि त्याचबरोबर आपलं स्वप्न साकार करत आहे.वाईआरएफ स्पाय युनिव्हर्सची पहिली महिला-केंद्रित फिल्म असलेल्या अल्फा ची निर्मिती आदित्य चोप्रा करत आहेत. या चित्रपटात आलिया आणि शर्वरी सुपर-एजंट्सच्या भूमिका साकारत आहेत, ज्यामध्ये ते दोघी स्पायवर्सच्या मिशनवर एकत्र येतात.
शर्वरी भारताची एक्शन स्टार होण्याची खूप मेहनत करत असून तिचं म्हणणं आहे, “माझं एक्शनवर खूप प्रेम आहे, आणि मी आणि माझ्या बहिणी ला एकत्रितपणे एक्शन चित्रपट पाहायला आवडतं. त्यामुळे अल्फाचा ऑफर मिळाल्यावर मी एक क्षणही न गमवता होकार दिला! माझ्या मनात नेहमी एक एक्टर म्हणून एक्शन करण्याचं स्वप्न होतं, आणि आता ते प्रत्यक्षात येत आहे.”मूंज्या आणि महाराज या दोन्ही हिट चित्रपटांमुळे शर्वरीची इंडस्ट्रीत ओळख निर्माण झाली आहे.
ती पुढे म्हणाली, “माझा नेहमीच विश्वास होता की एक्शन स्टार्सना शूटिंगमध्ये मजा येते कारण त्यांना स्टंट्स करण्याची संधी मिळते. आता मी स्वतः ही अनुभूती घेत आहे आणि ती खूपच मजेशीर आहे, पण शारीरिकदृष्ट्या तीव्र आणि थकवणारी सुद्धा. मी 200 टक्के मेहनत करत आहे आणि आशा आहे की लोकांना मी अल्फा मध्ये आवडेल ! मी पुढील काळात एक एक्शन स्टार बनण्याचं स्वप्न बाळगलं आहे, आणि अल्फा मध्ये ते साधण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करत आहे.
”वाईआरएफ स्पाय युनिव्हर्सच्या पहिल्या महिला-केंद्रित चित्रपटाला एक ग्रँड एक्शन अनुभव देण्यासाठी आदित्य चोप्रा कोणतीही कसर सोडत नाहीत. अल्फाचे दिग्दर्शन द रेलवे मॅन या यशस्वी सीरीजसाठी प्रसिद्ध असलेल्या शिव रवैल यांनी केलं आहे, जी यापूर्वी YRF ने तयार केली होती.आदित्य चोप्रा निर्मित वायआरएफ स्पाय युनिव्हर्स भारतीय सिनेमा सृष्टीतला सर्वात मोठा प्रोजेक्ट ठरला आहे. एक था टायगर, टायगर जिंदा है, वॉर, पठाण, टायगर 3 हे या स्पायवर्समधील चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत. अल्फा व्यतिरिक्त, वॉर 2 या स्पाय युनिव्हर्समधील चित्रपटावरही काम सुरू आहे.