*महेश काळे यांच्या दिवाळी कन्सर्ट मालिकेने उजळला महाराष्ट्*
सॅन फ्रान्सिस्को येथे राहणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे हे केवळ कलाकार नाहीत ,तर ते हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या समृद्ध परंपरेने जागतिक प्रेक्षकांना भुरळ घालणारे सांस्कृतिक राजदूत आहेत. भारतातील यशस्वी ‘अभंगवारी’ मैफिलीच्या दौऱ्यानंतर महेश काळे यांनी आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रवास सुरू केला आहे, दिवाळीसाठी ते फक्त आठ दिवसांत भारतभर – कोलकाता, डेहराडून, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि वडोदरा येथे आठ मैफिली सादर करत आहेत.
महेश काळे यांनी मुंबई (ठाणे, दादर आणि विलेपार्ले येथे आयोजित) तसेच पुणे आणि नाशिक येथे उत्साहवर्धक दिवाळी मैफिलींच्या मालिकेद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.प्रत्येक ठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले . यातूनच त्यांच्या प्रेरणादायी संगीताचा गौरव प्रतिबिंबित होतो . विशेष म्हणजे, पुणे आणि ठाण्यात, महेश काळे यांच्या सादरीकरणात तल्लीन होण्यास उत्सुक असलेले चाहते सकाळी ६ वाजता जमले होते . या सांगीतिक मैफिलींमधून शास्त्रीय राग आणि त्यांच्या मूळ रचनांचे मंत्रमुग्ध करणारे मिश्रण सादर करण्यात आले. काळे यांच्या स्वत:च्या बंदिशींनी एक वैयक्तिक स्पर्श जोडला ,जो श्रोत्यांमध्ये खोलवर परिणाम करणारा ठरला.
*मुंबईतील विलेपार्ले पूर्व येथील पार्ले टिळक विद्यालयात नुकत्याच झालेल्या आपल्या सादरीकरणात , महेश काळे यांनी आपल्या कलात्मकतेचे साक्षीदार होण्यासाठी मोकळ्या हवेच्या ठिकाणी तीव्र उन्हाचा सामना करणाऱ्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.दिवाळीच्या आतिषबाजीच्या पार्श्वभूमीवर महेश काळे यांनी काही उत्कृष्ट हिंदुस्थानी शास्त्रीय राग आणि अभंग सादर केल्यामुळे ती संध्याकाळ जादुई ठरली. त्यांच्या मैफलीत लागी कलेजवा कटार, अवीगत नाथ निरंजन देवा, देवाघरचे ज्ञात कुणाला, हे सुरांनो चंद्र व्हा , जन्मोजन्मी आम्ही बहू पुण्य केले आणि कानडा राजा पंढरीचा यासारख्या लोकप्रिय गाण्यांचा समावेश होता.या कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिद्ध अभिनेते जितेंद्र जोशी यांनी केले होते. तसेच या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेते उपेंद्र लिमये, मकरंद देशपांडे, , इशिता अरुण आणि संगीतकार ध्रुव घाणेकर यांची उपस्थिती लाभली. हे सर्व मान्यवर या कार्यक्रमाचा आनंद घेत होते.*
लोकप्रिय करमणुकीच्या अनेक ऑफर्स येत असूनही , आणि एक तरुण कलाकार म्हणून परदेशात वास्तव्य करूनही, महेश काळे शास्त्रीय संगीताच्या शुद्ध स्वरूपात ठामपणे रुजलेले आहेत.प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोकप्रिय ट्रेंडचे अनुकरण करण्याऐवजी, ते शास्त्रीय संगीत कलेतील समृद्ध परंपरेचा आदर करण्याला प्राधान्य देतात . यू एस मधून अभियांत्रिकी व्यवस्थापनाची ( इंजिनिअरिंग मॅनेजमेंट) पदवी घेऊनही आणि सिलिकॉन व्हॅलीमध्ये फायदेशीर कारकीर्दीची क्षमता असूनही, त्यांनी स्वतःला शास्त्रीय संगीतासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला.महेश काळे यांच्यासाठी, ही बांधिलकी करिअरच्या निवडींच्या पलीकडे आहे—हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शुद्ध सौंदर्य जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे ध्येय आहे.