Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*खऱ्या अर्थानी वसूची दिवाळी होणार साजरी !*

*खऱ्या अर्थानी वसूची दिवाळी होणार साजरी !*



 *'पुन्हा कर्तव्य आहे'* मालिकेत लकीने रचलेल्या डावपेचामुळे वसू अस्वस्थ आहे. घरातल्या एका व्यक्तीच्या दिवाळी भेट वस्तूमध्ये लकीने, वसू-लकीच्या लग्नाचा फोटो ठेवला आहे या प्रसंगामुळे वसू तणावात आहे. ती त्या गिफ्टच्या शोधात आहे. लकी वसूच्या भीतीचा आनंद करतोय, पण अचानक वसू त्याला सुनावते, की “मला तुझा भूतकाळ माहितेय”. यामुळे लकीला जयश्रीच्या खोलीतून तो फोटो परत घ्यावा लागतो. वसूच्या अशा वक्तव्यांमुळे लकी भूतकाळातील कृतींचा विचार करतोय यातच लकीला ठाकूर घर सोडावं लागणार आहे. आता वसू रियाच्या नावाचा वापर करून लकीला ब्लॅकमेल करतेय. ती त्याला रियाच्या नावाने एक मेसेज पाठवते, “मी सांगते तसं तू केलं नाहीस तर तुझं सगळं सत्य ठाकूरांना आणि पोलीसांना सांगेन आणि तुझं आयुष्य उद्ध्वस्त करेन.” लकीला तिकडे जावं लागतं. तिथे वसू रियाच्या वेशात त्याची वाट पाहत आहे. तिथे लकी ठाकूरांसोबत असण्यामागचा खरा उद्देश सांगतो.  वसूचे आई-वडील लकीच्या बोलण्याचं व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्ड करतात. तेव्हा वसुंधरा लकीला आकाशसोबतची भागीदारी मोडून ठाकूरांच्या आयुष्यातून कायमचा निघून जाण्याचं वचन देण्यास भाग पाडते. वसूच्या दिलेल्या वचनाप्रमाणे लकी ठाकूर घरी येऊन सगळ्यांना सांगतो की त्याला पार्टनरशिप चालू ठेवण्याचं रस नाही. तनया लकी आणि वसुंधरामध्ये नक्की काय नातं आहे याच्या मागे आहे. 

 

*आता वसूच सत्य उघकीस आणण्यास तनया यशस्वी होईल? बघायला विसरू नका 'पुन्हा कर्तव्य आहे' दररोज रात्री ९:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.