*“माझा आवडता दागिना नथ आहे” - कविता लाड*
*चारुलतामुळे, अक्षरा-अधिपतीच्या नात्यात येणार दुरावा !*
*चारुहास आणि चारुलताच्या लग्नात अक्षराचा गोंधळ !*
'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेत भुवनेश्वरीच सत्य सर्वांसमोर आणण्यासाठीअक्षराची कसरत चालू आहे. भुवनेश्वरी परत आलीये ह्या मतावर अक्षरा ठाम आहे. भुवनेश्वरी-चारुलता ह्या भोवऱ्यात अक्षरा पूर्णपणे अडकली आहे. चारुलताच्या म्हणण्यावरुन घरातल्या सगळ्यांनाच ह्यावर विश्वास बसू लागतो की अक्षराला मानसिक उपचारांची गरज आहे. अक्षरावर घरी कुणीच विश्वास ठेवायला तयार नाहीये. पण अक्षरा वारंवार भुवनेश्वरीला म्हणजेच चारुलताला आता थेट वॉर्निंग देऊ लागलेय की ती हे सिद्ध करुन दाखवणार की चारुलता म्हणजेच भुवनेश्वरी आहे. अक्षरा अधिपतीकडे हट्ट करते की बाबा आणि चारुलताचं लग्न थांबवलं पाहीजे पण दुसरीकडे चारुलता चारुहासला सांगते की अक्षराची तब्येत बघता लग्नाचा मुहूर्त अलिकडचाच घेतला पाहीजे. अक्षराला वेडी ठरवण्यात चारुलता यशस्वी होईल? अनपेक्षितपणे, दारात मनोरुग्णालयाची एक व्हॅन अक्षराला घेऊन जाण्यासाठी येते. ही संधी साधून चारुलता तिच्या आणि चारुहासच्या लग्नाची व्यवस्था करते. पण लग्नाच्या दिवशीच, अक्षरा मनोरुग्णालयातून पळून जाण्यात यशस्वी होते. तिच्या बंदिवासात, अक्षराने काही पुरावे गोळा केलेत. ती सर्वांसमोर भुवनेश्वरीच चारुलता आहे हे उघड करण्यासाठी लग्नात पोहोचते. या पुराव्यांमुळे चारुहास पूर्णपणे हादरनार आहे. आणि तिथेच तिथे अक्षराला हे देखील कळणार आहे की अधिपतीला या सर्व गोष्टी पहिल्यापासून माहित आहेत. या सगळ्यामुळे अक्षरा आणि अधिपती यांच्यात जोरदार वाद होऊन, अक्षरा अक्षराने घर सोडण्याचा निर्णय घेणार आहे. *मालिकेत नवरी म्हणून नटण्याचा आनंद व्यक्त करताना कविता लाड म्हणतात* , "खासगी आयुष्यात कविता इतकी नटत नाही पण 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेच्या निमित्ताने आणि खास म्हणजे भुवनेश्वरीमुळे मला खूप नटायला मिळत. एरवी नुसतं नटन ठीक आहे पण मालिकेतलं नटन चार-पांच दिवस चालत, आता माझं चारूहासचं लग्नाचं शूट चालू आहे जो पर्यंत शूट संपत नाही तो पर्यंत या मेकअप वर खूप लक्ष द्यावं लागत. कंटिन्यूटी लक्षात ठेवणं एक कसरत आहे. त्यामुळे मी तयार झाली कि कॅमेरासमोर उभी राहायच्या आधी एकदा सहायक दिग्दर्शकला सांगते एकदा तुम्हीही बघा कि सर्व ठीक आहे ना पण मज्जा येते काम करताना. मी आनंदात आहे कि "आय एम बॅक" म्हणजे मी भुवनेश्वरी म्हणून परत येतेय. चारुलताच्या नवरी लुक मधला माझा आवडता दागिना नथ आहे."
*अक्षरा खरंच घर सोडून जाईल? अधिपतीने हे सत्य अक्षरापासून लपवण्यामागचं खरं कारण काय असेल ? जाणून घेण्यासाठी बघत रहा 'तुला शिकवीन चांगलाच धडा' दररोज रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*